
वंदे भारत स्लीपरमध्ये 'तत्काळ कोटा' नाही; भारतीय रेल्वेकडून घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली : देशात लवकरच ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन्सची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून दूरच्या प्रवासासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती केली. या हाय-स्पीड स्लीपर ट्रेनच्या तिकिटांच्या आरक्षणाबाबत आणि शुल्काबाबत रेल्वेकडून मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये इतर एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे तत्काळ तिकिटांची सुविधा मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय तिकिटांच्या दराबाबतही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांच्या आरामाची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यात एसी ३-टायर, एसी २-टायर आणि फर्स्ट एसीचे अत्याधुनिकार कोच असतील. रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांना ‘तत्काळ कोटा’ अंतर्गत तिकिटे बुक करता येणार नाहीत. या गाड्यांमधील सर्व बर्थचे आरक्षण हे केवळ नियमित आरक्षित श्रेणीतूनच केले जाईल. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तत्काळ तिकिटाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांना आधीच आपले नियोजन करावे लागणार आहे. तसेच प्रवाशांना उत्तम झोपण्याची सोय, चार्जिंग पोर्ट, आधुनिक बायोटॉयलेट, स्वयंचलित दरवाजे आणि सुंदर अंतर्गत रचना या ट्रेनमध्ये पाहायला मिळणार आहे.
फ्लेक्सी फेअर आणि डायनेमिक भाडेपद्धत
या ट्रेनच्या भाड्याबाबतही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राजधानी किंवा शताब्दी एक्सप्रेसप्रमाणे वंदे भारत स्लीपरमध्ये सुरुवातीला फ्लेक्सी फेअर किंवा डायनेमिक भाडेपद्धत लागू असण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. मात्र, या ट्रेनच्या तिकिटांचे दर प्रवाशांच्या खिशाला परवडणारे ठेवण्याबाबत रेल्वे विचार करत असून, लक्झरी सुविधा आणि स्पीडनुसार याचे नियोजन केले जात आहे.
FAQ
1. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये तत्काळ तिकीट सुविधा मिळणार आहे का?
नाही. रेल्वेच्या नवीन नियमानुसार या ट्रेनमध्ये तत्काळ तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध नसेल.
2. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये तिकीट आरक्षण कसे करता येईल?
सर्व बर्थचे आरक्षण नियमित आरक्षित श्रेणीतूनच करता येणार आहे.
3. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये कोणते डबे असतील?
एसी ३-टायर, एसी २-टायर आणि फर्स्ट एसी असे तीन प्रकारचे डबे असतील.