
प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा घातपात टळला? हाय सिक्युरिटी परिसरातून संशयित कार जप्त; महिलेला अटक
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या हाय सिक्युरिटी परिसरात एका ४५ वर्षीय महिलेला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही महिला बनावट डिप्लोमॅटिक नोंदणी प्लेट असलेल्या इनोव्हा कारमधून परिसरात फिरत होती. दिल्ली पोलिसांचे पथक आणि सुरक्षा एजन्सी तिची चौकशी करत आहेत. प्रजासत्ताक दिन आणि दिल्लीत झालेल्या कार बॉम्बस्फोटांनंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संजीव कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेल्या वाहनाचा वापर करून एक महिला वारंवार विविध दूतावास आणि संवेदनशील डिप्लोमॅटिक क्षेत्रांना भेट देत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली. शाखेच्या खंडणी आणि अपहरण विरोधी कक्षात तैनात असलेले निरीक्षक दलीप कुमार यांनी १५ जानेवारी रोजी वसंत विहार परिसरात एक टोयोटा इनोव्हा एसयूव्ही पकडली. वाहनाची झडती घेत असताना, अधिकाऱ्यांना परदेशी दूतावासांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नंबर प्लेटसारखीच आणखी एक बनावट नंबर प्लेट सापडली.
हेदेखील वाचा : स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची प्रकृती खालावली; शंकराचार्यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस
दरम्यान, महिलेने सुरुवातीला परदेशी दूतावासाची प्रतिनिधी असल्याचा दावा केला होता, परंतु ती कोणत्याही दूतावासाचे नाव सांगू शकली नाही किंवा वाहनाशी संबंधित कोणतेही वैध राजनैतिक किंवा मालकीचे कागदपत्रे सादर करू शकली नाही. तिला चौकशीसाठी सनलाईट कॉलनीतील गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले.
वाहनावर लावली बनावट नंबर प्लेट
पोलिसांची तपासणी टाळण्यासाठी आणि प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सहजपणे एंट्री मिळवण्यासाठी तिने वाहनाची मूळ नंबर प्लेट काढून बनावट नंबर प्लेट लावली. पदवीधर असलेली महिला गेल्या चार वर्षांपासून एका राजकीय पक्षाची अखिल भारतीय सचिव असल्याचा दावा करते. तिने २०२३ ते २०२४ दरम्यान परदेशी दूतावासात सल्लागार म्हणून काम केल्याचा दावाही केला.
हेदेखील वाचा : Jammu-Kashmir Encounter : भारतीय लष्कराचा मोठा प्रहार! कठुआमध्ये पाकिस्तानी दहशतवादी ठार; संयुक्त कारवाईत यश