'आप'ला मोठा धक्का! आमदार अनमोल गगन मान यांचा राजीनामा, राजकारणही सोडले (फोटो सौजन्य-X)
MLA Anmol Gagan Mann : आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या आणि पंजाबमधील आमदार अनमोल गगन मान यांनी आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांनी केवळ विधानसभेचा राजीनामा दिला नाही तर राजकारणातून पूर्णपणे निवृत्तीची घोषणा केली आहे. हा निर्णय पक्ष आणि पंजाबच्या राजकारणासाठी एक मोठी बातमी मानला जातो. त्या पूर्वी आमदार म्हणून खरार विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या.
सोशल मीडियावर पोस्ट करत अनमोल गगन मान यांनी म्हटलं की, “जड अंतःकरणाने मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी आमदारपदाचा राजीनामा सभापतींकडे पाठवला आहे. मी त्यांना तो स्वीकारण्याची विनंती करते. माझ्या शुभेच्छा पक्षासोबत आहेत. मला विश्वास आहे की पंजाब सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल.
ਦਿਲ ਭਾਰੀ ਹੈ, ਪਰ ਮੈਂ ਸਿਆਸਤ ਛੱਡਣ ਦਾ ਫੈਸਲਾ ਲਿਆ ਹੈ।
ਮੇਰਾ MLA ਦੇ ਅਹੁਦੇ ਤੋਂ ਸਪੀਕਰ ਸਾਹਿਬ ਨੂੰ ਦਿੱਤਾ ਹੋਇਆ ਅਸਤੀਫਾ ਸਵੀਕਾਰ ਕੀਤਾ ਜਾਵੇ।
ਮੇਰੀਆਂ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾਵਾਂ ਪਾਰਟੀ ਨਾਲ ਹਨ । ਮੈਨੂੰ ਓਮੀਦ ਹੈ, ਪੰਜਾਬ ਸਰਕਾਰ ਲੋਕਾਂ ਦੀਆਂ ਉਮੀਦਾਂ ਤੇ ਖਰੀ ਉਤਰੇਗੀ |— Anmol Gagan Maan Sohi (@AnmolGaganMann) July 19, 2025
विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी, १५ जुलै रोजी त्यांनी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यांनी इन्स्टाग्रामवरही याबद्दल पोस्ट केले होते. त्यांनी लिहिले की, ‘राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याशी विविध प्रमुख मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली’.
अनमोल गगन मान यांचा राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण त्यांनी पंजाबमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. मान हे केवळ लोकप्रिय नेते नाहीत तर तरुण पिढीमध्ये त्यांची एक विशेष ओळख आहे.पंजाबमध्ये आपसाठी त्यांच्या संघात असे नेते तयार करणे हे एक आव्हान आहे जे मान यांची जागा भरू शकतील आणि पक्षाची लोकप्रियता टिकवून ठेवू शकतील. त्याच वेळी, विरोधी पक्षांनी या राजीनाम्याकडे पक्षातील राजकारणातील अनिश्चितता म्हणूनही पाहिले आहे.
हा राजीनामा आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढवू शकतात, विशेषतः पंजाबमध्ये जिथे पक्षाला आधीच अनेक नेत्यांकडून असंतोषाचा सामना करावा लागत आहे. सूत्रांच्या मते, पक्षाचे अंतर्गत व्यवहार आणि नेतृत्वाशी मतभेद ही याची मुख्य कारणे आहेत. विशेष म्हणजे, काल (शुक्रवार) खरार (मोहाली) येथील अकाली दलाचे नेते रणजित गिल यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा दिला. आता बातम्या येत आहेत की ते येत्या काही दिवसांत ‘आप’मध्ये सामील होऊ शकतात.