Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lucky Oberoi murder : पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा; AAP नेत्यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

आप नेते लकी ओबेरॉय यांच्यावर मॉडेल टाउनमधील गुरुद्वारा साहिब बाहेर हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून यामध्ये मृत्यू झाला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 06, 2026 | 11:20 AM
AAP Lucky Oberoi murdered in Punjab shot by gun in model town

AAP Lucky Oberoi murdered in Punjab shot by gun in model town

Follow Us
Follow Us:
  • आप नेते लकी ओबेरॉय यांची हत्या
  • गुरुद्वाराबाहेर झाडण्यात आल्या गोळ्या
  • लकी ओबेरॉय यांना सहा गोळ्या लागल्या
AAP Lucky Oberoi murder : पंजाब : जालंदरमध्ये धक्कादायक राजकीय हत्येची घटना घडली आहे. आम आदमी पक्षाचे (आप) नेते लकी ओबेरॉय यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांची हत्या केली. (Punjab Crime) लकी ओबेरॉय यांच्यावर गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जात आहे. (AAP Politics)

राजकारणामध्ये वैचारिक मतभेदांचे रुपांतर हे वैमनस्यात झाले आहे. यामुळे राजकीय नेत्यांवर हल्ले आणि हत्येच्या घटना लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. पंजाबमध्ये देखील पुन्हा एकदा राजकीय हत्येचा थरार दिसून आला आहे. आप नेते लकी ओबेरॉय यांच्यावर मॉडेल टाउनमधील गुरुद्वारा साहिब बाहेर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लकी ओबेरॉय हे गुरुद्वाराबाहेर आपली कार पार्क करत असताना हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्लेखोरांनी तब्बल 16 गोळ्या झाडल्या आहेत. यामधील ओबेरॉय यांना पाच गोळ्या लागल्या आहेत. यानंतर परिसरामध्ये एकच गोंधळ सुरु झाला. लकी ओबेरॉय यांना तात़डीने एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हे देखील वाचा : “किती दिवस जगाला फसवणार…”, पंतप्रधान मोदींनी शायरीतून विरोधकांना झापले; राज्यसभेतील Video व्हायरल

लकी ओबेरॉय यांच्यावर गोळीबाराची घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी आप नेते त्यांच्या थार वाहनात होते. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या छातीत आणि डोक्यात काही गोळ्या लागल्या आहेत. या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पंजाबचे राजकारण हे किती गढूळ झाले आहे हे देखील पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

हे देखील वाचा : “विरोधी पक्षनेते हे वयस्कर…”; राज्यसभेत PM Narendra Modi यांचा ‘या’ नेत्याला जोरदार टोला

पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे . भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी या प्रकरणाबाबत पंजाबच्या आप सरकारला घेरले आहे. एक्स वर पोस्ट करताना त्यांनी लिहिले आहे की, “पंजाबमध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आम आदमी पक्षाचे (आप) नेते लकी ओबेरॉय यांची जालंधर मॉडेल टाउनमधील गुरुद्वाराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आप हे पंजाबसाठी पाप आहे.”

राजकीय पार्श्वभूमी 

लकी ओबेरॉय यांच्या पत्नीने आम आदमी पक्षाच्या तिकिटावर नगरपालिका निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला. या हत्येप्रकरणी पोलिस अधिकारी स्थानिक दुकानदारांची चौकशी करत आहेत. ते सीसीटीव्ही फुटेजमधूनही काही पुरावा मिळत आहे का ते पाहत आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींच्या जबाब नोंदवण्यात आले आहेत. ओबेरॉय हे कॅन्टच्या आप प्रभारी राजविंदर कौर थियारा यांच्या जवळचे मानले जात होते. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

Web Title: Aap lucky oberoi murdered in punjab shot by gun in model town

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • AAP
  • crime news
  • Punjab News

संबंधित बातम्या

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
1

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
2

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
3

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.