नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास 24 तास शिल्लक राहिलेले असतानाच दिल्लीतील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या आमदारांना भाजपकडून ऑफर आल्याचा गौप्यस्फोट केला. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली होती. अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. आतापर्यंत त्यांच्या १६ उमेदवारांना भाजपकडून फोन आले असून, मंत्रीपद आणि 15-15 कोटी रुपये देण्याचे प्रलोभन दिले जात आहे. उमेदवारांना “आप” सोडून भाजपमध्ये येण्याचा दबाव टाकला जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
केजरीवाल यांच्या दाव्यानंतर भाजपनेही अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात थेट दिल्लीच्या उपराज्यपालांकडे तक्रार दाखल केली. तसेच केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांची एसीबी चौकशीही करण्याची मागणीही करण्यात आली आहे. भाजपच्या तक्रारीनंतर उपराज्यपाल एक्टिव्ह मोडवर आले असून त्यांनी लगेचच एसीबी चौकशीचे आदेश दिले आहे. राज्यपालांच्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. एसीबीची पाच जणांची टीम केजरीवालांच्या घरी दाखल झाली आहे.
दुसरीकडे एसीबीचे पथक घरी पोहोचताच, आम आदमी पक्षाच्या कायदेशीर पथकातील आणखी काही वकीलही अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. प्रत्यक्षात, भाजपच्या तक्रारीनंतर एलजीने एसीबीला चौकशीचे आदेश दिले होते. एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आप नेते संजय सिंह एसीबी कार्यालयात पोहोचले आहेत आणि त्यांची तक्रार देत आहेत. संजय सिंह यांचाही जबाब एसीबी कार्यालयातही नोंदवला जाऊ शकतो. तसेच, त्यांनी केलेले आरोपी एबीसी नोंदवून घेणार आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी एसीबीचे पथक दाखल झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कायदेशीर कक्षाचे प्रमुख संजीव नसियार म्हणाले की, ” गेल्या अर्ध्या तासापासून येथे बसलेल्या एसीबी टीमकडे कोणतेही कागदपत्रे किंवा सूचना नाहीत. ते सतत फोनवर कोणाशी तरी बोलत आहेत. जेव्हा आम्ही चौकशीसाठी नोटीस किंवा अधिकार मागितला तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे काहीही नसल्याचे म्हटले आहे.
संजीव नसियार म्हणाले की “संजय सिंह तक्रार दाखल करण्यासाठी आधीच एसीबी कार्यालयात दाखल झाले आहेत. तसेच एसीबीचे पथक कोणाच्या सूचनेवर इथे आले आहेत की जकीय नाटक घडवण्यासाठी भाजप हे षडयंत्र रचत आहे. हे लवकरच कळेल. पण जोपर्यंत कायदेशीर सूचना मिळत नाही तोपर्यंत कोणालाही केजरीवाल यांच्या निवासस्थानी प्रवेश मिळणार नाही, असंही नसियार यानी म्हटलं आहे.