दिल्लीची मतमोजणी किती वाजता सुरू होणार? कुठे पाहाल अचूक निकाल? वाचा सविस्तर
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये मागील दोन महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष, भाजप आणि कॉंग्रेसमध्ये तिरंगी लढत झाली. राजधानी दिल्लीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपने यावेळी पूर्ण प्रयत्न केले आहे. एका दशकानंतर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने प्रचाराचा धडाका लावला होता. आता उद्या (दि.08) फेब्रुवारी रोजी दिल्लीचा निकाल हाती येणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाने दहा वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानीत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आहेत. पक्षाने दोन टप्प्यांची प्रचार रणनीती आखली होती. यामध्ये आम आदमी पक्षाच्या (आप) कमतरता उघड करण्यावर लक्ष केंद्रित केले. सोशल मीडियावर देखील आपच्या अनेक प्रकल्पाचे आणि उपाययोजनेवर टीकास्त्र डागले. विकसित दिल्लीचे स्वप्न सादर करण्यासाठी आपने जाहीर केल्यानंतर योजनांवर भाजपने जोरदार टीका केली. मतदारांच्या असंतोषाचा फायदा घेण्यासाठी भाजपने पूर्ण प्रयत्न केले. यमुना नदीची बिघडत चाललेली स्थिती, सार्वजनिक सेवांमधील गैरव्यवस्थापन आणि ‘आप’च्या प्रशासनातील भ्रष्टाचाराचे आरोप यासारख्या मुद्द्यांवर भाजपने भर दिला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विशिष्ट मतदारसंघावर लक्ष केंद्रित
प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात काँग्रेसने दिल्लीत आपले प्रमुख प्रयत्न सुरू केले. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान, गांधी भावंडांनी १२ जाहीर सभा घेतल्या. प्रियंका गांधी-वड्रा यांनी चांदणी चौक, नवी दिल्ली, मुस्तफाबाद येथे जाहीर सभा घेतल्या आणि नांगलोई जाट मतदारसंघात रोड शो केला, तर भाऊ राहुल यांनी बल्लीमारन, मतिया महल, सदर बाजार, मादीपूर, पटपरगंज, बादली, बवाना आणि ओखला येथे प्रचार केला. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडून जोरदार प्रचार करुन घेतला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जानेवारीच्या सुरुवातीला काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिल्लीच्या निवडणूक प्रचारामध्ये सक्रीय सहभाग घेतला. राहुल गांधी यांची प्रकृती खराब असल्यामुळे सुरुवातीला ते सामील झाले नव्हते. मात्र नंतर त्यांनी दिल्ली अक्षरशः पिंजून काढली. दिल्लीची जबाबदारी राज्य युनिट प्रमुख देवेंद्र यादव, माजी मंत्री अजय माकन आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांच्यावर सोपवण्यात आली होती. कॉंग्रेसपुढे आप आणि भाजप या ताकदीच्या पक्षांचे आव्हान होते.
आम आदमी पक्षाने दिल्लीच्या निवडणुकीमध्ये जोरदार प्रचार केला. वैयक्तिक टीका करण्यापेक्षा आपने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. विकासकामे, त्यांची पूर्तता आणि 10 वर्षांमध्ये दिल्लीमध्ये झालेला बदल याबाबत आपने जास्त प्रचारावर भर दिला. त्याचबरोबर केंद्रीय नेत्यांनी दिल्लीबाबत घेतलेले निर्णय जे जाचक असल्याचे देखील आप नेत्यांकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावर खास पॉलिटिकल प्लॅनिंग करत आपने प्रचार केला.