Photo Credit- Social Media आपच्या आमदारांना ऑफरबाबत भाजपची एलजीं'कडे ACBचौकशीची मागणी
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशीच राजकीय वादळ उठले आहे. काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल, संजय सिंग आणि अन्य नेत्यांनी, आम आदमी पक्षाच्या (AAP) सात आमदारांना आम आदमी पक्ष सोडण्यासाठी 15-15 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला आहे. या आरोपांनंतर दिल्ली भाजपचे सरचिटणीस विष्णु मित्तल यांनी दिल्लीच्या उपराज्यपालांना पत्र लिहून भ्रष्टाचारविरोधी विभाग (ACB) आणि अन्य तपास यंत्रणांकडून एफआयआर नोंदवून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विष्णु मित्तल यांनी अरविंद केजरीवाल आणि संजय सिंग यांना चौकशीसाठी बोलावण्याची मागणी केली आहे. यावर उपराज्यपाल विनय सक्सेना यांनी ACB ला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे AAP आमदारांच्या खरेदी-विक्रीच्या आरोपांची तपासणी केली जाणार असून अहवाल उपराज्यपालांना सादर केला जाईल.
AAP आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. AAP ने भाजपवर आरोप केला आहे की, त्यांचे आमदार फोडण्यासाठी त्यांना 15-15 कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे. ६ फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले की, भाजपने ‘AAP’ च्या 16 आमदारांना मोठी रक्कम ऑफर करत पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला. AAP च्या वरिष्ठ नेत्यांनी देखील हे आरोप करत “लोकशाहीवर हल्ला” असल्याचे म्हटले आहे. तसेच, निवडणूक संपल्यानंतर भाजप दिल्लीतील ‘AAP’ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.
AAP चे काही आमदार मीडियासमोर येऊन भाजपने त्यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा करत आहेत. मुकेश अहलावत (सुल्तानपूर माजरा), प्रेम चौहान (देवली), अंजना पार्चा (त्रिलोकपुरी), विनय मिश्रा (द्वारका) या आमदारांनीही त्यांना भाजपकडून फोन आल्याचा दावा केला आहे. मुकेश अहलावत यांनी आरोप केला आहे की, त्यांना भाजप नेते प्रवेश साहिब सिंग वर्मा यांच्याकडून फोन आला होता. त्यांना 15 कोटी रुपये आणि मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती.
AAP खासदार संजय सिंग यांनी ACB चौकशीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत सांगितले की, ते स्वतः ACB कार्यालयात जाणार असून भाजपकडून कोणत्या क्रमांकावरून फोन आले, याचीमाहिती दिली जाणार आहे. भाजप फक्त ड्रामा करत आहे, पण आम्ही खरी तक्रार करण्यासाठी आलो आहोत. भाजप सोशल मीडियावर आमचे ट्विट पाहून आता जागी झाली आहे.
संजय सिंग यांनी भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले की, “भाजपला आमच्या बाबूजींच्या (मोठ्या नेत्यांच्या) इशाऱ्याची वाट पाहत होते, त्यामुळे ते आता चौकशी सुरू करत आहेत. आतापर्यंत भाजपने १६ हून अधिक आमदारांशी संपर्क साधला आहे, ज्यांची माहिती आम्ही आधीच जाहीर केली आहे.”