देशात सध्या रस्ते अपघातांच प्रमाण (Accidents) वाढल्याचं दिसत आहे. गेल्या महाराष्ट्रात समृद्दी महामार्गावर अपघात (Smrudhhi Highway) होऊन अनेक लोकांना प्राण गमवावे लागले होते. यामुळे एक्सप्रेस वेवरील वाहनधारकांच्या अपघाताबद्दल चिंता व्यक्त करण्यात आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील यमुना एक्सप्रेस वेवर (Yamuna Expressway) सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामंध्ये महिलेसह पाच जणांचा समावेश आहे.
[read_also content=”यमुना नदीनं ओलाडंली धोक्याची पातळी! दिल्लीत पुराची भीती, सखल भागातील नागरिकांना इशारा https://www.navarashtra.com/india/delhi-rains-yamuna-river-flows-above-danger-mark-at-206-56m-in-435910.html”]
सोमवारी पहाटे 4.10 च्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. यमुना एक्स्प्रेसवेच्या माईल स्टोन 56 वर आग्राहून नोएडाला जाणाऱ्या कारला अज्ञात कारणांमुळे अपघात झाला. कारमध्ये एक महिला, एक पुरुष आणि एक बाळ ओरडत होते, ते तिघेही जखमी अवस्थेत कारमध्ये अडकले होते आणि मदतीसाठी ओरडत होते.
या दरम्यान तिथून जाणाऱ्या काही युवक त्यांचा आरडाओरडा ऐकून चार तरुण थांबले आणि गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढू लागले. यावेळी धरमवीर नावाच्या मुलाने कारमधून चिमुकलीला बाहेर काढले आणी कारमध्ये अडकलेल्या महिलेला पुष्पेंद्र सिंग, पुष्पेंद्र चौधरी आणि पवन चौधरी बाहेर काढत होते. दरम्यान, मागून येणाऱ्या व्होल्वो बसने कारसह या सर्व तरुणांवर धडक घेतली. या अपघातात या तीन तरुणांसह एक महिला आणि आधीच कारमध्ये असलेल्या एका पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महिला, मुलगी आणि कार चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
धरमवीरने कारमधून रडणाऱ्या एका मुलीला धरमवीरने बाहेर काढले आणि धरमवीर त्या मुलीला घेऊन फूटपाथवर आला. मात्र, यावेळी उर्वरित तीन तरुण कारमध्ये अडकलेल्या महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर अचानक मागून येणाऱ्या व्होल्वो बसने त्यांना उडवलं. मात्र, धरमवीर कारमधून मुलीला काढून फुटपाथवर आल्याने ती मुलगी आणि धरमवीर बचावले.