Riches CM In India: भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. या देशात एकूण 29 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. दरम्यान ADR या संस्थेच्या अहवालानुसार 27 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीबद्दल माहिती समोर आली आहे. तुम्ही राहत असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
देशातील 27 राज्यांचे व 3 केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांच्या संपत्तीबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रीफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉरने जाहीर केला आहे. एडीआरच्या रिपोर्टणूसार, 30 मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती 1,632 कोटी रुपये इतकी आहे.
समोर आलेल्या रिपोर्टनुसार देशात दोनच मुख्यमंत्री अरबपती आहेत. तर काही मुख्यमंत्र्यांकडे 1 कोटीपेक्षा कमी संपत्ती आहे. तर कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे, हे जाणून घेऊयात.
चंद्राबाबू नायडू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री
एडीआरच्या रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे 913 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. तर दुसऱ्या स्थानी पेमा खांडू हे आहेत. ते अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे 332 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत कर्नाटकचे सिद्धरामय्या यांचा नंबर आहे. त्यांच्याकडे 51 कोटींची संपत्ती आहे.
ममता बॅनर्जींकडे किती आहे संपत्ती?
दूसरी ओर, पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी इस सूची में सबसे कम संपत्ति वाली नेता हैं। उनके पास महज 15.38 लाख रुपये की संपत्ति है। दूसरे नंबर पर जम्मू-कश्मीर के पूर्व मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हैं, जिनके पास 55.24 लाख रुपये से ज्यादा की संपत्ति है। इसके अलावा केरल के मुख्यमंत्री पिनाराई विजयन के पास 1.18 करोड़ रुपये, राजस्थान के मुख्यमंत्री भजन लाल शर्मा के पास 1.46 करोड़ रुपये की संपत्ति है।
दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे 15.38 लाखांची संपत्ती आहे. तर त्यांच्या पाठोपाठ ओमर अब्दूला यांच्याकडे 55.24 लाखांची संपत्ती आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांकडे 1.18 कोटींची संपत्ती आहे. तर राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडे 1.46 कोटींची संपत्ती आहे.
रिपोर्ट कसा तयार केला गेला?
एडीआरने हा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीयआधी दिलेल्या प्रतिज्ञापत्र यावरून तयार केला आहे. मणीपुरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्याने त्या ठिकाणचा रिपोर्ट यामध्ये समाविष्ट नाहीये.