Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तामिळनाडू, पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांत होणार विधानसभा निवडणुका; लवकरच वाजणार बिगूल

पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 03, 2026 | 11:46 AM
तामिळनाडू, पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांत होणार विधानसभा निवडणुका; लवकरच वाजणार बिगूल

तामिळनाडू, पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांत होणार विधानसभा निवडणुका; लवकरच वाजणार बिगूल

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता देशात पश्चिम बंगालसह महत्त्वाच्या 5 राज्यांत विधानसभा निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजणार आहे. सध्या निवडणूक आयोग विविध राज्यांच्या दौऱ्यावर आहे. तसेच काही राज्यांतील एसआयआर अर्थात मतदार यादी पुनर्रीक्षणाच्या कामातील त्रुटी दूर करण्यात येत आहेत. हे काम झाल्याबरोबर निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. २०२१ च्या तुलनेत यावेळी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यास थोडा उशिर लागला आहे. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये २६ फेब्रुवारी रोजीच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता.

दरम्यान, लोकशाहीच्या उत्सवात तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांवर आयोग विशेष लक्ष देणार आहे. मतदारांसाठी मतदान करणे सोयीचे व्हावे यादृष्टीने मतदान केंद्रांची रचना व घरापासूनचे अंतर ठेवण्यावर भर देतानाच मतदारांना आपला अधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यावरही आयोग लक्ष देणार आहे.

राज्यसभेची अनेक पक्षांकडून तयारी सुरु

दुसरीकडे, पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्या तरी दुसरीकडे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी तयारी सुरु आहे. यातील एका जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम असून, राज्यसभेवर शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाणार, यावर अजूनही एकमत झालेले नाही. राज्यसभेच्या एका जागेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनंतर आता आमदार वरुण सरदेसाई यांनीही दावा केला आहे. शरद पवार मोठे नेते, पण आम्ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका सरदेसाई यांनी व्यक्त केली.

हेदेखील वाचा : शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; काँग्रेस-शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाची

Web Title: Assembly elections will be held in five states of the country including tamil nadu and west bengal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • indian politics
  • west bengal election

संबंधित बातम्या

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य
1

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.