Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Election Commission Order On SIR: बिहारनंतर आता सर्व राज्यांत SIR;निवडणूक आयोगाचा निर्णय

निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात एसआयआर प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे, तर दुसरीकडे, विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकार आणि निवडणूक आयोगाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 25, 2025 | 02:29 PM
Election Commission Order On SIR: बिहारनंतर आता सर्व राज्यांत SIR;निवडणूक आयोगाचा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

Election Commission Order On SIR:   निवडणूक आयोगाचा आदेश SIR वर: मतदार यादीच्या विशेष सघन आणि सुधारणा पडताळणी(SIR) बाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिथे विशेष सघन आणि सुधारणा पडताळणी (SIR) सुरू आहे. बिहारच्या धर्तीवर आता प्रत्येक राज्यात ही विशेष सघन आणि सुधारणा पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. आयोगाने नुकताच यासंदर्भात आदेश जारी केली आहे. मतदार याद्यांची निष्पक्षता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्याचे आपले संवैधानिक कर्तव्य पार पाडण्यासाठी आयोगाने देशभरात एसआयआर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे आयोगाने म्हटले आहे.

“मतदार याद्यांतील पारदर्शकता आणि शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी, निवडणूक आयोगाने २४ जून रोजीच्या आदेशात स्पष्ट केले आहे की, आयोगाच्या संवैधानिक जबाबदारीनुसार देशभरात ‘विशेष सघन पुनरावृत्ती’ (SIR) राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील उर्वरित भागांसाठी SIR चे वेळापत्रक योग्य वेळी जाहीर करण्यात येईल.”

IND vs ENG: आर. अश्विन गौतम गंभीरवर संतापला! या खेळाडूला वगळण्यावर प्रश्नचिन्ह केले उपस्थित

बिहार एसआयआर अंतिम टप्प्यात

बिहारमधील मतदार यादीची विशेष सघन आणि सुधारणा पडताळणी (SIR) प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आतापर्यंत ९९ टक्के मतदारांना या प्रक्रियेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच, मतदार यादीचा प्रारूप तयार करण्याचे काम जोरात सुरू असल्याचे, राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, कोणताही मतदार किंवा राजकीय पक्ष मतदार यादीतून नाव वगळण्याबाबत किंवा चुकीचे नाव जोडण्याबाबत १ सप्टेंबरपर्यंत दावा किंवा आक्षेप दाखल करू शकतो.

एसआयआर’ला विरोधकांचा विरोध

एकीकडे, निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात एसआयआर प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे, तर दुसरीकडे, विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकार आणि निवडणूक आयोगाला तीव्र विरोध दर्शवला आहे. आज (२५ जुलै) काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा आणि समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या खासदारांसह प्रतीकात्मकपणे एसआयआर फाडला आणि तो कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला.

मालदीवचा माज उतरला? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला मुइज्जूसह संपूर्ण मंत्रिमंडळ हजर

मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार – प्रमोद तिवारी

बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विशेष सघन आणि सुधारणा पडताळणी (SIR) च्या मुद्द्यावर काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनीदेखील टीका केली आहे. ‘SIR ही साधी गोष्ट नाही, ही लोकशाहीची हत्या आहे. मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, म्हणून आम्ही प्रत्येक पातळीवर लोकशाही पद्धतीने लढा सुरू ठेवणार आहोत, असं तिवारी यांनी म्हटलं आहे.

SIR म्हणजे काय?

Special Intensive Revision (SIR) म्हणजे मतदार यादीतून गैर-योग्य व्यक्ती (जसे की मृत व्यक्ती, स्थलांतरित व्यक्ती, डुप्लीकेट नावे किंवा अवैध प्रवासी) हटविणे आणि नवीन पात्र मतदार जोडणे. SIR चा उद्देश आहे: मतदार यादीमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करून फक्त 18 वर्षांवरील भारतीय नागरिकांचा समावेश करणे.

बिहारमध्ये SIR प्रक्रिया:

ही प्रक्रिया 24 जून 2025 पासून सुरू झाली आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2025 असून ड्राफ्ट मतदार यादी 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित होणार आहे. मतदात्यांनी दस्तऐवज नसतानासुद्धा गणना फॉर्म भरण्याची परवानगी आहे. दस्तऐवज नसल्यास ERO स्थानिक पातळीवर सत्यापन करून निर्णय घेईल.

 

Web Title: After bihar now sir in all states election commission decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • election commission of india

संबंधित बातम्या

Maharashtra News: ‘महाराष्ट्र निवडणुकीत मतचोरी कशी झाली?’ या माहितीपटाची लिंक पाठवण्यास TRAI चा नकार; काँग्रेस आक्रमक
1

Maharashtra News: ‘महाराष्ट्र निवडणुकीत मतचोरी कशी झाली?’ या माहितीपटाची लिंक पाठवण्यास TRAI चा नकार; काँग्रेस आक्रमक

Rahul Gandhi News: गुजरातमधील अज्ञात पक्षांना ४३०० कोटींच्या देणग्या? राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2

Rahul Gandhi News: गुजरातमधील अज्ञात पक्षांना ४३०० कोटींच्या देणग्या? राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल
3

‘वोटवा चोर लागेला..’;ऐन निवडणुकीत भोजपुरी गाण्याचा तडका, काँग्रेसकडून मतचोरीचे गाणे व्हायरल

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले
4

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.