पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीव दौऱ्यावेळी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझूने यांनी संपूर्ण मंत्रिमंडळासह मोदींचे स्वागत केले (फोटो - सोशल मीडिया)
PM Narendra Modi Maldives Visit : मालदीव : मागील दोन वर्षांपूर्वी मालदीव आणि भारतामध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मालदीव दौऱ्यावर गेले असून तिथे त्यांचे केलेले जय्यत स्वागत हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरले आहे. एकेकाळी भारताला आव्हान देणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे स्वतः जातीने पंतप्रधान मोदींच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित होते. त्यांच्याबरोबर मालदीवचे संपूर्ण मंत्रिमंडळ देखील उपस्थित होते. यामुळे बायकॉट इंडियापासून वेलकम मोदी असा मोहम्मद मुइज्जू यांचा पवित्रा भारताची आंतरराष्ट्रीय ताकद दाखवून देत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटीन दौऱ्यावरुन थेट मालदीवला गेले आहेत. यावेळी राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी गळाभेट घेत मोदींचे स्वागत केले. यावेळी मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांपासून ते संरक्षण मंत्री, अर्थ मंत्री आणि होमलँड सिक्युरिटीचे मंत्री त्यात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रिटीन दौरा अत्यंत यशस्वी ठरला आहे. या दौऱ्यामधून व्यापाराबाबत मोठी घडामोड घडली आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे दोन्ही देशांच्या व्यापाराला आणि गुंतणूकीला चालना मिळणार असून मुक्त व्यापार करारामुळे भारतीय व ब्रिटीश गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे. यानंतर आता पंतप्रधान मोदी हे मालदीव दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे मालदीव आणि भारतामध्ये देखील राजकीय संबंध सुधारुन पुन्हा एकदा जोमाने पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मावदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या आमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालदीव दौऱ्यावर गेले आहेत. मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. याच वर्षी भारत आणि मालदीवच्या राजनैतिक संबंधांना 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा मालदीव दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे..
मालदीवच्या पर्यटनावर झाला होता मोठा परिणाम
दोन वर्षांपूर्वी भारत व मालदीव देशातील संबंध ताणले गेले होते. याला मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी बेजबाबदारपणे केलेले वक्तव्य होते. त्यांनी मालदीवची सत्ता मिळवण्यासाठी इंडिया आऊटचा नारा दिला होता. त्यावेळी अनेक एक्सपर्टना वाटलेलं की, भारताने आपल्या जवळच्या समुद्र भागीदाराला गमावलं आहे. मात्र यानंतर मालदीवच्या पर्यटनावर याचा मोठा परिणाम झाला. मालदीवची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या पर्यटनावर परिणाम झाल्यामुळे मोठा अर्थिक फटका देखील बसला होता.
Landed in Malé. Deeply touched by the gesture of President Muizzu to come to the airport to welcome me. I am confident that India-Maldives friendship will scale new heights of progress in the times to come.@MMuizzu pic.twitter.com/GGzSTDENsE
— Narendra Modi (@narendramodi) July 25, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मोहम्मद मुइज्जू यांची ही इंडिया आऊट मोहीम मालदीवमधील भारतीय सैनिकांच्या उपस्थितीच्या विरोधात होती. त्यानंतर त्यांनी सांगितले की सत्तेत येताच मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैनिकांना ते परत करेल. महत्त्वाचे म्हणजे मालदीवमध्ये 77 भारतीय सैनिकांची एक पथक उपस्थित होते.
चीनला मोठा धक्का
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा मालदीव दौरा आहे. मोदी 2018 साली पहिल्यांदा राष्ट्रपती सोलिह यांच्या शपथ ग्रहणाच्यावेळी मालदीवला गेले होते. त्यानंतर 2019 साली पीएम मोदी यांनी मालदीवचा द्विपक्षीय दौरा केला. आता पीएम मोदी राष्ट्रपती मुइज्जू यांच्या निमंत्रणावरुन मालदीवला गेले आहेत. पंतप्रधान मोदींचा मालदीव दौरा हा चीनसाठी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मोठा धक्का मानला जात आहे. कारण चीन भारताच्या या जुन्या मित्राला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत होता.