Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता बद्री-केदारनाथमध्येही भ्रष्टाचार; RTI मधून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे दावा

मंदिर समितीतील काही सदस्यांनी प्रवास भत्ता (टीए) आणि दैनिक भत्त्याच्या (डीए) नावाखाली एका वर्षापेक्षाही कमी कालावधीत लाखो रुपये घेतले. त्यांनी हा निधी भाविकांनी दिलेल्या देणग्यांमधून खर्च झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 28, 2026 | 01:04 PM
आता बद्री-केदारनाथमध्येही भ्रष्टाचार

आता बद्री-केदारनाथमध्येही भ्रष्टाचार

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराचा वाद सुरू असतानाच आता बद्री-केदार मंदिर समितीवरही (बीकेटीसी) आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि वरिष्ठ वकील विकेश सिंह नेगी यांनी माहितीच्या अधिकारातून (आरटीआय) मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे काही धक्कादायक दावे केले आहेत.

नेगी यांच्या म्हणण्यानुसार, मंदिर समितीतील काही सदस्यांनी प्रवास भत्ता (टीए) आणि दैनिक भत्त्याच्या (डीए) नावाखाली एका वर्षापेक्षाही कमी कालावधीत लाखो रुपये घेतले. त्यांनी हा निधी भाविकांनी दिलेल्या देणग्यांमधून खर्च झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

इतरही गंभीर आरोप

नेगी यांनी काही सदस्यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून भत्ते घेतल्याचा आरोप केला. तसेच एका सदस्याच्या प्रवास बिलावर लेखा विभागाने आक्षेप घेतला असतानाही त्याचे पैसे मंजूर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वीही त्यांनी मंदिर निधीतून व्हीआयपी पाहुण्यांच्या स्वागतासाठी खर्च झाल्याचा आणि समितीच्या उपाध्यक्षांनी आपल्या पत्नीला कर्मचारी दाखवून पैसे घेतल्याचा आरोप केला होता.

आरटीआयमधून माहिती आली समोर

नेगी यांनी सांगितले की, मंदिर कायद्यानुसार समितीच्या अधिकृत कामासाठी किंवा बैठकीसाठी प्रवास केला तरच सदस्यांना भत्ता मिळू शकतो. त्यानुसार, सदस्यांना आमदारांप्रमाणे दररोज ६ हजार रुपये दैनिक भत्ता आणि प्रति किलोमीटर ४ रुपये प्रवास भत्ता देण्याची तरतूद आहे. मात्र, त्यांनी दावा केला की, सध्याच्या समितीची नियुक्ती झाल्यानंतर केवळ एकच अधिकृत बैठक झाली होती. तरीही काही सदस्यांनी ८ महिन्यांत मोठ्या प्रमाणात भते घेतल्याचे आरटीआयमधून समोर आले आहे.

वैयक्तिक दौरे अधिकृत

नेगी यांनी आरोप केला की, काही सदस्यांनी विविध धार्मिक कार्यक्रम आणि वैयक्तिक दौरे हे अधिकृत कार्यक्रम असल्याचे दाखवून भत्ते घेतले. त्यांच्या म्हणण्यानुसार, बसंत पंचमीनिमित्त नरेंद्रनगर येथे झालेल्या बद्रीनाथ मंदिराचे कपाट उघडण्याच्या तारखेच्या कार्यक्रमालाही काही सदस्यांनी अधिकृत कार्यक्रम म्हणून दाखवून पैसे घेतले. प्रत्यक्षात हा कार्यक्रम टिहरी राजघराण्याच्या परंपरेनुसार आयोजित केला जातो, असा दावा त्यांनी केला.

केदारनाथ दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरचा खर्च मंदिर निधीतून

केदारनाथ आणि इतर धामांच्या दौऱ्यांसाठी हेलिकॉप्टरचा खर्चही मंदिराच्या निधीतून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व आरोपांबाबत बद्री-केदार मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. नेगी यांनी स्पष्ट केले की, समिती किंवा अध्यक्ष यांची बाजू समोर आल्यास तीही सार्वजनिक केली जाईल.

PM Rashtriya Bal Puraskar 2026 : ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’द्वारे आता ‘या’ मुलांना मिळणार राष्ट्रीय ओळख !

Web Title: After ram mandir corruption in badri kedarnath too

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Ayodhya Ram Temple
  • Ram Temple

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.