Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर मोदी अन् भाजपा दोघांनी ४०० पार जागांचा अर्थच बदलला; भाषणातून सांगितला अर्थ; वाचा सविस्तर

मतदानाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत जेव्हा ४००चा पार आकड्याचा उल्लेख व्हायचा, तेव्हा जनता समाधानी आहे, त्यांना केंद्रात पुन्हा मोदी सरकार हवे आहे, असा त्याचा अर्थ घेतला जायचा. परंतु, पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपने या घोषणेचा अर्थच बदलला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 27, 2024 | 01:47 PM
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर मोदी अन् भाजपा दोघांनी ४०० पार जागांचा अर्थच बदलला; भाषणातून सांगितला अर्थ; वाचा सविस्तर
Follow Us
Follow Us:

PM Modi Changed Slogen Meaning : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता भाजपने ‘अब की बार 400 पार’ दिलेल्या नाऱाचा अर्थ बदलून वेगळा अर्थ सागंत आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रसंगी ४०० पारचा नारा दिला आहे. यंदा सरकारच्या कामगिरीच्या जोरावर ते जनतेकडून ४०० जागा मागत आहेत. विशेष म्हणजे मतदानाच्या पहिल्या टप्प्यापासून हा नारा प्रत्येक रॅलीत आणि प्रत्येक प्रचारात ऐकू येत होता. मात्र, पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर हे सर्व बदलले, एकीकडे ४०० पारचा नारा गायब होताना दिसत होता, तर दुसरीकडे कुठेतरी त्याचा वापर केला जात असला तरी तो वेगळ्या उद्देशाने जनतेसमोरे ठेवण्याचा प्रयत्न भाजपाने चालवला आहे.

आरक्षण वाचवण्यासाठी अब की बार…….

मतदानाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत जेव्हा ४००चा पार आकड्याचा उल्लेख व्हायचा, तेव्हा जनता समाधानी आहे, त्यांना केंद्रात पुन्हा मोदी सरकार हवे आहे, असा त्याचा अर्थ घेतला जायचा. आतासुद्धा मोदी ४०० चा आकडा पार करण्याचा नारा देत आहेत. पण, आता त्याचा अर्थ आरक्षण वाचवण्याशी लावला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिल रोजी मध्य प्रदेशमधील सागरमध्ये म्हणाले की, विरोधक विचारतात की, ४०० जागांची गरज का आहे?

दलित, ओबीसी, आदिवासींना वाचवण्यासाठी 400 पार

तुम्ही लोक दलित, आदिवासी आणि ओबीसींचे हक्क लुटण्याचा खेळ खेळत आहात, तुमचा हा खेळ थांबवण्यासाठी मला ४०० जागांची गरज आहे. काँग्रेसने स्वतःच्या जाहीरनाम्याला निवडणुकीचा मोठा मुद्दा बनवल्याने त्या जाहीरनाम्यापासून वाचवण्यासाठी ४०० पार करण्याचा उल्लेखही केला जात आहे, असंही आता भाजपाकडून सांगितलं जात आहे.

सात वर्षांपासून योगीजींचे सरकार

१६ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत पंतप्रधानांच्या सुमारे ६० भाषणांकडे पाहिल्यास निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर ४०० पार जागांचा अर्थच बदलण्यात आला आहे. संविधान बदलण्यासाठी मोदी ४०० हून अधिक जागांचं टार्गेट ठेवत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. खरं तर १९ एप्रिल रोजी अमरोहा येथे त्यांच्या भाषणादरम्यान ४०० जागा पारची व्याख्याच बदलल्याचं समोर आले. “मी त्यांना उत्तर प्रदेशबद्दल सांगतो, जिथून मी खासदार आहे. सात वर्षांपासून योगीजींचे सरकार आहे. प्रशासन म्हणजे काय आणि कायदा आणि सुव्यवस्था काय असते हे त्यांनी सात वर्षांत दाखवून दिले आहे. त्यामुळेच यूपीमध्ये योगीजींच्या नेतृत्वात २०१४ आणि २०१९ चा विक्रम मोडला जाईल आणि यूपी विक्रमी जनादेश देईल, असंही मोदी म्हणाले होते.

आंध्र प्रदेशातील एससी/एसटी आरक्षण कमी करून

२३ एप्रिल रोजी राजस्थानच्या टोंक सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण वाढवून मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न केला आहे. २००४ मध्ये काँग्रेसने केंद्रात सरकार स्थापन करताच आंध्र प्रदेशातील एससी/एसटी आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना देणे ही त्यांची पहिली कारवाई होती. खरं तर हे राज्यघटनेच्या पूर्णपणे विरोधात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना आरक्षणाचा अधिकार दिला होता, तो काँग्रेसला धर्माच्या आधारावर द्यायचा आहे.

आंध्र प्रदेशात चार वेळा मुस्लिम आरक्षण

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आंध्र प्रदेशातील मुस्लिमांना एससी/एसटी आरक्षण देण्याचा प्रयत्न हा एक पायलट प्रोजेक्ट होता. काँग्रेसला संपूर्ण देशात हा प्रयत्न करायचा होता. २००४ ते २०१० या काळात काँग्रेसने आंध्र प्रदेशात चार वेळा मुस्लिम आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सजगतेमुळे ते आपला हेतू पूर्ण करू शकले नाहीत. २०११ मध्ये काँग्रेसनेही त्याची देशभर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेसला संविधानाची आणि बाबासाहेब आंबेडकरांची पर्वा नव्हती. हे सर्व संविधानाच्या मूळ भावनेच्या विरुद्ध आहेत हे माहीत असतानाही काँग्रेसने राजकारण आणि व्होटबँकेसाठी असे प्रयत्न केले, असंही मोदी म्हणाले होते.

काँग्रेसने सर्व मुस्लिमांना ओबीसी कोट्यात टाकून ओबीसी बनवले

विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या बांसवाडा भाषणाच्या तीन दिवसांनंतर मुस्लिमांचा उल्लेख केला होता. तसेच, काँग्रेस सत्तेवर आली तर संसाधने ज्यांना जास्त मुले आहेत त्यांच्याकडे वळतील आणि घुसखोरही वाढतील. काँग्रेसने सर्व मुस्लिमांना ओबीसी कोट्यात टाकून ओबीसी बनवले आणि या समाजातील लोकांना दिलेले आरक्षणाशी छेडछाड केली, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. या निर्णयावर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने कर्नाटक सरकारकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

राज्यात मुस्लिमांसाठी ४ टक्के कोटा १९९४ पासून

कर्नाटक सरकारने उत्तर दिले की, राज्यात मुस्लिमांसाठी ४ टक्के कोटा १९९४ पासून होता, बसवराज बोम्मई सरकारने तो रद्द केला होता. कर्नाटक सरकारच्या आकडेवारीनुसार, सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणासाठी कर्नाटकातील सर्व जाती आणि मुस्लिम समुदायांचा मागासवर्गीय (OBC) यादीत समावेश करण्यात आला आहे. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस (NCBC) नुसार, कर्नाटक राज्यातील सर्व मुस्लिमांचा OBC श्रेणी 2B अंतर्गत विचार करण्यात आला आहे.

 

तारखांबद्दल जर बोलायचे झाले तर निवडणुकीच्या घोषणेनंतर तीन दिवसांच्या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदींनी १७ वेळा ४०० जागा ओलांडण्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे भाजपाची रणनीती त्यावेळी स्पष्ट होत होती. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या काही दिवस आधीपासूनच पंतप्रधान मोदींनी आपल्या सभांमधून ४०० जागा पार करण्याचा उल्लेख करून विकसित भारताचे स्वप्न दाखवले. आम्हाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाव्यात, अशी त्यांची इच्छा आहे, असंही तेव्हा ते जनतेच्या वतीने सांगत होते. पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे कारण संविधान बदलण्यासाठी आणि आरक्षण संपवण्यासाठी भाजपाला ४०० चा आकडा पार करायचा आहे, अशी विरोधक बोंबाबोंब करीत आहेत. त्यामुळे भाजपाने नाऱ्याचा अर्थच बदलण्याचा खटाटोप चालवला आहे. त्याला थोडा वेगळा रंग देण्याचे काम केले आहे.

Web Title: After the first phase of polling both modi and bjp changed meaning of 400 par seats the meaning conveyed in speech read in detail nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2024 | 01:46 PM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi NZ Visit: ’30 वर्षांपूर्वी मित्राने दिलेला ‘तो’ मफलर…’; पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंड दौऱ्यात सांगितला ‘तो’ भावनिक प्रसंग
1

PM Modi NZ Visit: ’30 वर्षांपूर्वी मित्राने दिलेला ‘तो’ मफलर…’; पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंड दौऱ्यात सांगितला ‘तो’ भावनिक प्रसंग

Digital India: पंतप्रधान मोदींची ऑकलंडमध्ये मोठी घोषणा; आता न्यूझीलंडमध्येही चालणार भारताचे UPI! विद्यार्थ्यांसह पर्यटकांची चंगळ
2

Digital India: पंतप्रधान मोदींची ऑकलंडमध्ये मोठी घोषणा; आता न्यूझीलंडमध्येही चालणार भारताचे UPI! विद्यार्थ्यांसह पर्यटकांची चंगळ

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार
3

Uranium Price: सोन्यापेक्षा महाग असणारे युरेनियम ऑस्ट्रेलिया कोणत्या देशांना विकतो? नुकताच भारताशी झालाय मोठा करार

PM Modi: ऑस्ट्रेलियन महिला कॅमेरामनच्या ‘अशा’ इशाऱ्याने पंतप्रधान मोदींनाही लावले मागे वळायला; ‘या’ मजेदार प्रसंगाचा VIDEO VIRAL
4

PM Modi: ऑस्ट्रेलियन महिला कॅमेरामनच्या ‘अशा’ इशाऱ्याने पंतप्रधान मोदींनाही लावले मागे वळायला; ‘या’ मजेदार प्रसंगाचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.