Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिरुपतीनंतर आता मथुरा-वृंदावनच्या प्रसाद भेसळीवर प्रश्नचिन्ह? 48 तासांत घेतले 13 नमुने

तिरुपती मंदिर प्रसादम वादानंतर आता सपा खासदार डिंपल यादव यांनी वृंदावनमध्ये उपलब्ध असलेल्या प्रसादाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशच्या अन्न आणि औषध विभागाने मथुरा आणि वृंदावनच्या मंदिरात सापडलेल्या प्रसादाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 23, 2024 | 01:31 PM
तिरुपतीनंतर आता मथुरा-वृंदावनच्या प्रसाद भेसळीवर प्रश्नचिन्ह? 48 तासांत घेतले 13 नमुने

तिरुपतीनंतर आता मथुरा-वृंदावनच्या प्रसाद भेसळीवर प्रश्नचिन्ह? 48 तासांत घेतले 13 नमुने

Follow Us
Close
Follow Us:

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद वादानंतर आता मथुरा-वृंदावनमध्ये मिळणाऱ्या प्रसादावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यावेळी सपा खासदार डिंपल यादव यांनी वृंदावनमध्ये मिळणाऱ्या प्रसादाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला आहे. वृंदावनात योग्य दर्जाचा खवा वापरला जात नसल्याच्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. डिंपल यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर प्रश्न उपस्थित करत संबंधित विभागाने काहीतरी करायला हवे, असे सांगितले. सरकार भाजपचे आहे. त्यांनी यावर काम करावे. तिरुपती लड्डू प्रसादम वादावर डिंपल यादवनेही तिची प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान देशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर प्रसादाच्या नावावर गायीची चरबी आणि माशाचे तेल मिळून लाडू खाल्ल्या यावर लोकांचा विश्वास बसत नाही. यामुळे हजारो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. लोकांना असे वाटते की त्यांचे शरीर शुद्ध होण्याऐवजी अपवित्र झाले आहे. याचदरम्यान डिंपल यादव पुढे म्हणाल्या की, तिरुपती मंदिराच्या प्रसादात चरबी मिसळली जात असल्याचे पाहून वाईट वाटते. आणि ते शोधू शकले नाही हेही कुठेतरी संबंधित विभागाचे अपयश आहे. सर्व मंदिरातील देऊळांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यूपीचे अन्न आणि औषध विभाग कारवाईत

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात चरबी आढळल्याच्या वृत्तानंतर मथुरा येथील अन्न आणि औषध प्रशासन विभाग कारवाईत आला आहे. वृत्तानुसार, गेल्या ४८ तासांत वेगवेगळ्या ठिकाणी विकल्या जाणाऱ्या प्रसादाचे एकूण १३ नमुने घेण्यात आले आहेत. आणि ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे नमुने श्री कृष्ण जन्मभूमी, वृंदावनच्या बांकेबिहारी मंदिरा आणि गोवर्धनच्या दांगटी मंदिराबाहेरील दुकानांमधून घेण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त धीरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, या दुकानांमधून नमुने घेण्यात आले असून ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

Web Title: After tirupati now a question mark on mathura vrindavans prasad 13 samples taken in 48 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 01:31 PM

Topics:  

  • mathura

संबंधित बातम्या

‘काशी-मथुरा’ प्रकरणावर RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, “आंदोलनाचे समर्थन…”
1

‘काशी-मथुरा’ प्रकरणावर RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, “आंदोलनाचे समर्थन…”

मोठी बातमी! श्रीकृष्ण जन्मभूमी- ईदगाह प्रकरणात हिंदू पक्षाला मोठा धक्का; हायकोर्टाने फेटाळली ‘ही’ महत्वाची याचिका
2

मोठी बातमी! श्रीकृष्ण जन्मभूमी- ईदगाह प्रकरणात हिंदू पक्षाला मोठा धक्का; हायकोर्टाने फेटाळली ‘ही’ महत्वाची याचिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.