Ahmedabad plane crash Ahmedabad today News
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला आहे. एअर इंडियाच्या लंडन गॅटविक या विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र उड्डाणानंतर फ्लाइट AI171 याचा अवघ्या काही मिनिटांमध्ये अपघात झाला आहे. या विमानाने 1.31 मिनिटांनी टेक ऑफ घेतले होते. मात्र अवघ्या सात मिनिटांमध्ये 1.37 मिनिटांनी विमानाचा अपघात झाला आहे. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान एका रुग्णालयावर कोसळले आहे. यामुळे मृतांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. विमानामधील 12 क्रू मेंबरची देखील माहिती समोर आली आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या या विमान अपघातामध्ये मृतांची संख्या मोठी असणार आहे. अपघात झालेल्या विमानामध्ये 242 प्रवाशी प्रवास करत होते. त्याचबरोबर 12 क्रू मेंबर देखील विमानामध्ये होते. 242 प्रवाशांमध्ये ब्रिटीश नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानामध्ये १६९ भारतीय तर ५३ ब्रिटिश नागरिक प्रवाशामध्ये असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक विमानात अधिकृत माहिती एअर इंडियाने दिली आहे. त्याचबरोबर विमानाने 12 क्रू मेंबर देखील होते.
अहमदाबाद अपघात प्रकरणाबाबतअपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
एअर इंडियाच्या या फ्लाइट AI171 या विमानामध्ये 12 क्रू मेंबर होते. या 12 क्रू मेंबरची नावे समोर आली आहे. तसेच 2 वैमानिक होते. कमांडर म्हणून कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट अधिकारी म्हणून क्लाईव्ह कुंदर कार्यरत होते. त्याचबरोबर यामध्ये अपर्णा महाडिक, श्रद्धा धवन (केबिन एक्झ्युक्युटिव्ह 1), दीपक पाठक (केबिन एक्झ्युक्युटिव्ह 2), इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील, मनिषा थापा यांचा समावेश होता.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान अहमदाबामध्ये कोसळले आहे. एअर इंडियाचे एआय १७१ हे विमान कोसळले आहे. विमान कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. उड्डाण करताना हे विमान कोसळले आहे. लंडनला जाणाऱ्या या विमानाने नुकतेच उड्डाण केल्याने त्यामध्ये इंधन देखील मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अपघाताची तीव्रता वाढताना दिसून येत आहे. अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अपघाताची तीव्रता लक्षात घेत गृहमंत्री अमित शाह यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
अहमदाबाद-लंडन गॅटविक या विमानाने उड्डाण घेतलेली फ्लाइट AI171 ही आज, १२ जून २०२५ रोजी एका घटनेत सामील झाली. सध्या, आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स http://airindia.com आणि आमच्या X हँडलवर (https://x.com/airindia) शेअर करू, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.