Akhilesh Yadav expels Samajwadi Party's Pooja Pal from party for praising Yogi Adityanath
Pooja Pal out From Samajwadi Party : पाटणा : उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये जोरदार राजकारण तापले आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. मात्र हे कौतुक भाजप नेत्यांनी नाही तर समाजवादी पक्षाच्या महिला नेत्यांनी केल्यामुळे वाद वाढला आहे. सपाच्या आमदार पूजा पाल यांना पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. पक्षाने त्यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये काल (दि.13) विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. विधानसभेमध्ये व्हिजन डॉक्युमेंट 2047 यावर तब्बल 24 तासांचे मॅरेथॉन चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये समाजवादी पार्टीचे नेते सहभागी झाले होते. यावेळी सपाच्या आमदार पूजा पाल यांनी योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरुन कोडकौतुक केले. मात्र मुख्यमंत्र्यांचा हा कौतुक सोहळा पूजा पाल यांना महागात पडला आहे. त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सभागृहामध्ये चर्चासत्रामध्ये सहभागी होताना पूजा पाल यांनी योगींच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. त्या सभागृहात म्हणाल्या की सर्वांना माहिती आहे की त्यांच्या पतीची हत्या कशी आणि कोणी केली आणि अशा कठीण काळात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले आणि त्यांना न्याय मिळवून दिला, ज्याबद्दल त्यांनी भरसभागृहामध्ये कृतज्ञता व्यक्त केली. पूजा पाल पुढे म्हणाल्या की ‘प्रयागराजमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासारख्या अनेक महिलांना न्याय दिला आहे आणि गुन्हेगारांना शिक्षा दिल्या आहेत. राज्यातील लोक मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवतात, मुख्यमंत्र्यांनी माझ्या पतीचा खुनी अतिक अहमद याला संपवण्याचे काम केले, आणि मी त्यांच्या शून्य सहनशीलतेच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन करते.’अशी भूमिका आमदार पूजा पाल यांनी घेतली.
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग
सपा आमदार पूजा पाल यांच्या सभागृहातील वक्तव्यानंतर अखिलेश यादव यांनी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अलिकडेच, उत्तर प्रदेशात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या सात आमदारांमध्ये पूजा पाल या देखील होत्या. अलिकडेच सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी तीन बंडखोर आमदारांना पक्षातून काढून टाकले. आमदार मनोज पांडे, राकेश प्रताप सिंह आणि अभय सिंह यांना काढून टाकण्यात आले होते परंतु त्यावेळी अखिलेश यादव यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आता पूजा पाल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
फुलपूर पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारासाठी मते मागितली होती. सपाविरुद्ध बंड करणाऱ्या पूजा पाल कौशांबीच्या चैल विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. यापूर्वीही प्रयागराजच्या फुलपूर जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत त्या भाजप उमेदवार दीपक पटेल यांच्या समर्थनार्थ मते मागत होत्या, तर या जागेवर सपा आणि भाजपमध्ये थेट लढत होती. तिच्या या हालचालीवर अनेक सपा नेते नाराज होते.