Amazon-2
मुंबई : जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने (Amazon) आपल्या ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ (Work from Office) धोरणाबाबत कठोर भूमिका घेत आहे. जे कर्मचारी कार्यालयात परतण्याच्या आदेशाचे पालन करत नाहीत. त्यांना व्यवस्थापकांनी काढून टाकावे. अॅमेझॉनने रिटर्न-टू-ऑफिस (Return to Office) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत कंपनी या धोरणाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करू शकते.
अॅमेझॉनच्या ऑफिस टू रिटर्न पॉलिसीनुसार, आता सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येणे बंधनकारक झाले आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने हा नियम पाळला नाही. तर कंपनी मॅनेजर त्याच्यावर कारवाई करू शकतो. कंपनीने अंतर्गत पोर्टलवर कर्मचाऱ्यांना याची माहितीही दिली आहे. अॅमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येण्यास सांगितले आहे. परंतु, जे या नियमाचे पालन करत नाहीत, त्यांना तीन टप्प्यातील योजनेचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
पहिल्या टप्यात तीन दिवस कार्यालयात न येणाऱ्या कर्मचाऱ्यांशी व्यवस्थापक स्वतः चर्चा करणार आहेत. हे संभाषण मेलद्वारे केले जाईल. यानंतर येत्या 1 ते 2 आठवड्यात कर्मचारी कार्यालयात रुजू न झाल्यास व्यवस्थापकाशी चर्चा केली जाईल. यानंतरही कर्मचाऱ्याने नियमांचे पालन केले नाही तर तिसऱ्या टप्यात एचआर कर्मचाऱ्याला त्याच्या अनुपस्थितीचे कारण विचारेल. यानंतर त्यांना इशारा पत्र लिहिण्यात येणार आहे.