Operation Sindoor/Amit Shah Vs Akhilesh Yadav: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन सिंदूरवर बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधक गोंधळ घालत असल्याने अमित शहा यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज संसदेत ऑपरेशन महादेव बाबत माहिती दिली. ऑपरेशन महादेवअंतर्गत भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अमित शाह बोलत असताना समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी टिपण्णी केली. यावर अमित शाह यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.
संसदेत नेमके काय घडले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत ऑपरेशन महादेव अंतर्गत काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या लष्करी कारवाईची माहिती देत होती. शाह बोलत असतानाच विरोधकांनी सभागृहात गदारोळ माजवण्यास सुरुवात केली. यावेळी अमित शाह यांनी अखिलेश यादव यांना दुःखी न होण्याचा सल्ला दिला आहे.
VIDEO | Parliament Monsoon Session: Union Home Minister Amit Shah (@AmitShah) responds to Samajwadi Party MP Akhilesh Yadav's remark during debate on Operation Sindoor, says, "I was expecting that the opposition will be happy to hear that Pahalgam attack perpetrators have been… pic.twitter.com/i8m7sTrSj5 — Press Trust of India (@PTI_News) July 29, 2025
तर झाले असे की, अमित शाह बोलत असताना समाजवाद पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी मध्येच उठून टिपण्णी केली. त्यावेळेस अमित शाह यांनी यादव यांना खाली बसण्यास सांगितले. ‘दहशतवाद्यांचा धर्म पाहून तुम्ही दुःखी होऊ नका’ असा सणसणीत टोला अमित शाह यांनी अखिलेश यादव यांना लगावला आहे.
ऑपरेशन सिंदूर’ वरून अमित शहांचा संसदेत रुद्रावतार
काय म्हणाले होते माजी गृहमंत्री पी. चिदंबरम?
एका मुलाखतीच्या कार्यक्रमात पी. चिदंबरम यांनी मागील काही दिवसांमध्ये एनआयएने काय केले हे ते लपवू पाहत आहेत. त्यांनी दहशतवाद्यांची ओळख केली का? ते कुठून आले होते? ते स्थानिक दहशतवादी होते, इतकेच आम्हाला माहिती आहे. ते पाकिस्तानमधून आले होते याचा पुरावा नाहीये.
“चिदंबरम अँड कंपनीच्या काळातील १० पैकी… “; ‘ऑपरेशन सिंदूर’ वरून अमित शहांचा संसदेत रुद्रावतार
अमित शाह काय म्हणाले?
आज संसदेत दुसऱ्या दिवशी देखील ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा केली. संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पी. चिदंबरम यांच्यावर निशाणा साधलाय. यूपीए सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी कारवाया करणाऱ्या १० लोकांची नवे वाचून दाखवली. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्यात आला होता. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमध्ये आम्ही पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला केला होता. एका अर्थी आम्ही भारताच्या भागावर हल्ला केला. पाकिस्तानमधील काश्मीर हे भारताचेच आहे. मात्र यावेळेस आम्ही पाकिस्तानमध्ये १०० किलोमीटर आत घुसून त्यांच्या जमिनीवर त्यांच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.