अमित शहांची विरोधकांवर टीका (फोटो- संसद टीव्ही)
नवी दिल्ली/Operation Sindoor: आज संसदेत दुसऱ्या दिवशी देखील ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या एका वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. अमित शहा यांनी दहशतवाद्यांची नावेच संसदेत वाचून दखवली. पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत दहशतवादी पाकिस्तानमधून आले होते याचा काही पुरावा नाही, असे विधान केले होते.
काय म्हणाले होते माजी गृहमंत्री पी. चिदंबरम?
एका मुलाखतीच्या कार्यक्रमात पी. चिदंबरम यांनी मागील काही दिवसांमध्ये एनआयएने काय केले हे ते लपवू पाहत आहेत. त्यांनी दहशतवाद्यांची ओळख केली का? ते कुठून आले होते? ते स्थानिक दहशतवादी होते, इतकेच आम्हाला माहिती आहे. ते पाकिस्तानमधून आले होते याचा पुरावा नाहीये.
अमित शाह काय म्हणाले?
संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पी. चिदंबरम यांच्यावर निशाणा साधलाय. यूपीए सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी कारवाया करणाऱ्या १० लोकांची नवे वाचून दाखवली. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्यात आला होता. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमध्ये आम्ही पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला केला होता. एका अर्थी आम्ही भारताच्या भागावर हल्ला केला. पाकिस्तानमधील काश्मीर हे भारताचेच आहे. मात्र यावेळेस आम्ही पाकिस्तानमध्ये १०० किलोमीटर आत घुसून त्यांच्या जमिनीवर त्यांच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.
#WATCH | दिल्ली: कांग्रेस नेता पी चिदंबरम के बयान पर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने कहा, "मुझे बहुत दुख हुआ कि कल इस देश के पूर्व गृह मंत्री चिदंबरम जी ने सवाल उठाया कि क्या सबूत है कि ये आतंकी पाकिस्तान से आए थे। वे क्या कहना चाहते हैं? किसे बचाना चाहते हैं? पाकिस्तान को बचाकर… pic.twitter.com/0ucyp1nQGW
— ANI_HindiNews (@AHindinews) July 29, 2025
पी. चिदंबरम अँड कंपनीच्या काळातील देशविरोधी कारवाया करणाऱ्या ८ दशतवाद्यांना नरेंद्र मोदी सरकारने ठार मारले आहे. तुमच्या काळात जे लोक लपून बसले होते, त्यांना आमच्या सैन्याने वेचून वेचून ठार मारले आहे. सैन्याने १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारले.
ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी-राजनाथ सिंह आमने-सामने
“आम्ही दशतवादाला मुळापासून संपवण्याचा निर्धार केला आहे. आम्ही राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उध्वस्त केले आहेत. १०० पेक्षा जास्त दहशतवादी आणि हँडलर्स मारले गेले. भारत कोणत्याही अवस्त्र युद्धाच्या भीतीला भीक घालणार नाही. दहशतवादाचा बिमोड केला जाणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलांना कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पहलगाममधील हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. हे घृणास्पद आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
“मग तुम्ही का…?” ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी-राजनाथ सिंह आमने-सामने; संसदेत गदारोळ
संसदेत सीजफायरवर चर्चा सुरु असताना राहुल गांधी आणि राजनाथ सिंह यांच्यात थोडासा वादविवाद झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय लष्कराने जेव्हा शत्रू राष्ट्राच्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली तेव्हा, पाकिस्तानने हार स्वीकारली होती. त्यानंतर पाकिस्तानने सीजफायरची मागणी केली, असे राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले. यावर राहुल गांधी यांनी मग तुम्ही ऑपरेशन थांबवले का? असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाने विरोधकांनी संसदेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.