operation kaveri
सुदानमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून अंतर्गत कलह (Sudan Crisis) सुरू आहे. त्यामुळं तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र खात्याकडून मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’(Operation Kaveri) राबवण्यात येत आहे.
सुदानची राजधानी खार्तुमसह बऱ्याच ठिकाणी सुरु असलेला हिंसाचार सुदानमधील स्थिती अस्थिर बनवत आहे. भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी परत आणण्याचं काम सध्या सुरु आहे. भारतीय वायुसेनाचे विमान 231 नागरिकांना घेऊन नवी दिल्लीत पोहचलं आहे. परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी यासंदर्भातली माहिती ट्विट करत दिली आहे.
Another #OperationKaveri flight comes to Mumbai.
246 more Indians come back to the motherland. pic.twitter.com/So7dlKO0z6
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) April 27, 2023
सुदानहून भारतात परतलेल्या प्रवाशांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. सुदानहून भारतात परतलेल्या एक ज्येष्ठ महिला प्रवासी प्रतिक्रिया देताना भावूक होत म्हणाल्या, “भारत महान देश आहे. पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्य लाभो.” मुंबईत दाखल झालेल्या निशा मेहता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. सुदानमधून परत भारतात आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.
#WATCH | Second flight carrying 246 Indian evacuees from Sudan, lands in Mumbai#OperationKaveri pic.twitter.com/4PTRZflZgo
— ANI (@ANI) April 27, 2023
उच्चस्तरीय बैठक
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सुदानमध्ये अडकलेल्या तीन हजाराहून अधिक भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणण्याचे निर्देश दिले होते.
[read_also content=”कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात भाजप आमदाराने सोनिया गांधींना म्हटलं ‘विषकन्या’, पाकिस्तान आणि चीनची एजंट असल्याचाही आरोप https://www.navarashtra.com/india/karnataka-elections-2023-bjp-mla-yatnal-called-sonia-gandhi-agent-of-china-pakistan-and-vishkanya-nrsr-392798/”]
1100 भारतीय सुखरुप मायदेशी आले परत
अंतर्गत संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आधी जहाजानं सौदीची राजधानी जेद्दाहमध्ये आणावं लागतं आणि मग तिथून हवाई मार्गे त्यांना भारतात आणलं जातं. आतापर्यंत एकूण 1100 भारतीयांना सुदानहून सुखरुप परत आणण्यात आलं आहे. सर्व देशांच्या नागरिकांना मायदेशी नेता यावं म्हणून सुदानमध्ये युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे.