Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Election Results : नेपाळमध्ये मोठा सत्ताबदल! आता अमेरिका समर्थक सरकार? भारत चीनचं टेन्शन वाढणार?

ताज्या कलानुसार, बालेन शाह यांचा पक्ष बहुमताच्या जवळ असून ते नेपाळचे पुढचे पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्यांचा हा विजय भारत आणि चीन या दोन्ही शेजारील देशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 06, 2026 | 07:28 PM
( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • बालेन शाह पुढचे पंतप्रधान होण्याची दाट शक्यता
  • बालेन शाह: अमेरिकेचे नवे ‘मोहरे’?
  • बालेन शाह यांचा भारतविरोधी चेहरा
Nepal Election Results : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये सध्या ऐतिहासिक राजकीय बदल पाहायला मिळत आहेत. नेपाळमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत काठमांडूचे माजी महापौर आणि लोकप्रिय युवा नेते बालेन शाह यांच्या ‘राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी’ (RSP) ने अनपेक्षित मुसंडी मारली आहे. ताज्या कलानुसार, बालेन शाह यांचा पक्ष बहुमताच्या जवळ असून ते नेपाळचे पुढचे पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्यांचा हा विजय भारत आणि चीन या दोन्ही शेजारील देशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

Iran-US War: कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘अ‍ॅडव्हायझरी’; सुरक्षेसाठी घराबाहेर न पडण्याच्या सूचना

निवडणुकीचे ताजे कल

नेपाळमधील मतमोजणीत बालेन शाह यांच्या ‘आरएसपी’ने (RSP) प्रस्थापित राजकीय पक्षांना धूळ चारली आहे. आरएसपी (RSP) पक्षाने 4 जागांवर विजय मिळवला असून 107 जागांवर आघाडीवर आहे. नेपाळी काँग्रेस पक्षाने एका जागेवर विजय आणि १२ जागांवर आघाडीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सीपीएन-यूएमएल (के.पी. शर्मा ओली)यांचा पक्ष 11 जागांवर आघाडीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बालेन शाह: अमेरिकेचे नवे ‘मोहरे’?

बालेन शाह यांना पाश्चात्य देशांचे, विशेषतः अमेरिकेचे खंबीर समर्थक मानले जाते. नेपाळमध्ये गेल्या वर्षी झालेल्या ‘जेन-झी’ (Gen-Z) आंदोलनांमागे बालेन शाह यांचा मोठा हात होता, असे म्हटले जाते. काही आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, अमेरिकन संस्था USAID ने ‘डेमोक्रेसी प्रोग्राम’च्या माध्यमातून नेपाळमधील तरुण नेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले आहेत. बालेन शाह हे याच मोहिमेचा भाग असल्याचे बोलले जात आहे. बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या सत्ताबदलानंतर आता नेपाळमध्येही अमेरिका समर्थक सरकार येणे, ही आशियाई राजकारणातील मोठी घटना मानली जात आहे.

बालेन शाह यांचा भारतविरोधी चेहरा

बालेन शाह हे पेशाने स्ट्रक्चरल इंजिनिअर आणि माजी रॅपर आहेत. काठमांडूचे महापौर असताना त्यांनी अनेकदा भारताला डिवचण्याचे प्रयत्न केले आहेत. भारतीय संसदेतील ‘अखंड भारत’च्या चित्राला उत्तर म्हणून शाह यांनी आपल्या कार्यालयात ‘ग्रेटर नेपाळ’चा नकाशा लावला होता, ज्यामध्ये भारताचे काही भाग नेपाळचे असल्याचे दाखवण्यात आले होते.
‘आदिपुरुष’ चित्रपटातील एका संवादामुळे त्यांनी नेपाळमध्ये हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याची धमकी दिली होती.
बालेन शाह हे कट्टर राष्ट्रवादी विचारांचे असून ते भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या प्रभावापासून नेपाळला दूर नेऊन पाश्चात्य देशांच्या जवळ नेण्याचे धोरण आखत आहेत.

भारत आणि चीनची डोकेदुखी वाढणार?

आतापर्यंत नेपाळमधील राजकारण हे भारत समर्थक किंवा चीन समर्थक अशा दोन गटात विभागलेले असायचे. मात्र, बालेन शाह यांच्या रूपाने तिसरा गट (अमेरिका समर्थक) सत्तेत येत आहे.
नेपाळमधील नव्या समीकरणामुळे चीनच्या ‘बीआरआय’ (BRI) प्रकल्पांना खीळ बसू शकते. सीमावाद आणि पाणीवाटपाच्या मुद्द्यांवर बालेन शाह आक्रमक पवित्रा घेऊ शकतात, ज्यामुळे भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणासमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

बालेन शाह यांचा उदय हा नेपाळमधील प्रस्थापित भ्रष्टाचार आणि जुन्या राजकारण्यांविरुद्धचा जनतेचा रोष असल्याचे मानले जात आहे. मात्र, त्यांच्या सत्तेत येण्यामुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असून, भारत आणि चीनला नेपाळबाबत आपले धोरण नव्याने आखण्याची वेळ आली आहे.

Iran-US War: इराण आता तडजोडीसाठी तयार? ट्रम्प यांचा मोठा दावा!

Web Title: Nepal election results balendra shah rashriya swatantra party leads tensions for india and china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • America
  • China
  • india
  • nepal

संबंधित बातम्या

Gaza Row : गाझातील मानवतावादी संकटावरून अमेरिकन राजदूतांचा ब्रिटनवर ‘सेमेटिझम’चा आरोप
1

Gaza Row : गाझातील मानवतावादी संकटावरून अमेरिकन राजदूतांचा ब्रिटनवर ‘सेमेटिझम’चा आरोप

UK-Israel Row : इस्रायली वस्त्यांशी संबंधित १७ कंपन्यांना ब्रिटनचे २.१ अब्ज पौंडांचे कंत्राट
2

UK-Israel Row : इस्रायली वस्त्यांशी संबंधित १७ कंपन्यांना ब्रिटनचे २.१ अब्ज पौंडांचे कंत्राट

US Plane Crash: अमेरिकेत सिएरा स्काय पार्क विमानतळाजवळ छोटे विमान कोसळले; 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 2 गंभीर जखमी
3

US Plane Crash: अमेरिकेत सिएरा स्काय पार्क विमानतळाजवळ छोटे विमान कोसळले; 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 2 गंभीर जखमी

Satwik-Chirag चा दमदार ‘स्मॅश’! China Masters मध्ये भारतीय जोडीची विजयी घोडदौड; मलेशियाला धूळ चारत फायनलमध्ये धडक
4

Satwik-Chirag चा दमदार ‘स्मॅश’! China Masters मध्ये भारतीय जोडीची विजयी घोडदौड; मलेशियाला धूळ चारत फायनलमध्ये धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.