Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेनमध्ये चढण्यावरुन दोघांत वाद, संतापलेल्या एका प्रवाशानं थेट एक्सप्रेसलाच लावली आग, 3 जणांचा नाहक बळी, 9 जण जखमी

एक्सप्रेसमध्ये चढण्यावरुन दोन प्रवाशांत वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या एका प्रवाशानं दुसऱ्यावर चिडून पेट्रोल ओतलं, त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. यात एक्सप्रेसच्या डब्यालाच आग लागली. यात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 9 जण जखमी झालेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2023 | 12:51 PM
ट्रेनमध्ये चढण्यावरुन दोघांत वाद, संतापलेल्या एका प्रवाशानं थेट एक्सप्रेसलाच लावली आग, 3 जणांचा नाहक बळी, 9 जण जखमी
Follow Us
Close
Follow Us:

तिरुअनंतपूरम : ट्रेनमध्ये चढण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला, आणि त्या वादाचा परिणाम 3 जणांच्या मृत्यूत झालाय. ऐकून कुणालाही धक्का बसेल अशी ही घटना आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला. एक्सप्रेसमध्ये चढण्यावरुन दोन प्रवाशांत वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या एका प्रवाशानं दुसऱ्यावर चिडून पेट्रोल ओतलं, त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. यात एक्सप्रेसच्या डब्यालाच आग लागली. यात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 9 जण जखमी झालेत. मृतांमध्ये एक महिला, एक लहानगी आणि एका पुरुषाचा समावेश आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात हा प्रकार घडला. या दुर्घटनेत 3 जणांच्या मृत्यूनंतर, त्यांचे मृतदेह रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या रेल्वे रुळांवर पोलिसांना सापडलेत.

जळीतकाडांतील आरोपी फरार

हे भयंकर कृत्य केल्यानंतर हा प्रवासी फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून, या नराधमाचा शोध आता घेण्यात येतोय. मृतांची ओळख पटली आहे. मत्तन्नूरमध्ये राहणारा रहमथ, त्याची बहीण आणि तिची दोन वर्षांची चिमुरडी या दुर्घटनेत नाहक मृत्यूमुखी पडलेत. तर या रेल्वेनं प्रवास करणारी दोन कुटुंब यात जखमी झालीयेत. सगळ्या जखमींना कोझिकोडेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरुयेत.

रेल्वेरुळांवर सापडले 3 मृतदेह

अलपुझ्झा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये रविवारी रात्री 9.45 च्या सुमारास हा प्रकार घडला. ट्रेनने कोझिकोडे पार केल्यानंतर काही वेळातच दोन प्रवाशांमध्ये भांडण झालं. त्यातील एकानं दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर प्रवाशांनी साखळी खेचून ट्रेन थांबवली आणि या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली.

ज्यावेळी रेल्वे पोलीस डब्यात पोहचले. त्यावेळी एक महिला आणि मुलगी बेपत्ता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या दोघांचा तपास सुरु करण्यात आला त्यावेळी इलाथूर रेल्वे स्टेशनजवळ रुळांवर तीन मृतदेह पोलिसांना सापडले. डब्यात आग लागल्याचं पाहून त्यांनी धावत्या गाडीतून उडी मारल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. किंवा ते या गोंधळात गाडीतून पडले असल्याचीही शक्यता आहे. आरोपीला पकडण्यासाठी आता आसपासच्या सीसीटीव्हींचा शोध सुरु करण्यात आलाय.

Web Title: Argument between two over boarding the train an angry passenger set fire to the express 3 killed 9 injured nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2023 | 12:51 PM

Topics:  

  • india
  • आग

संबंधित बातम्या

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
1

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?
2

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?
3

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने
4

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.