Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ ; बंगल्याच्या नूतनीकरणाचे कॅग ऑडिट होणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबतीत अडचणी वाढताना दिसत आहेत. केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावरील खर्चाचे विशेष कॅग ऑडिट करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. यापूर्वी एलजीकडून या संदर्भात शिफारस करण्यात आली होती. मीडिया रिपोर्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे म्हटले होते.

  • By Aparna
Updated On: Jun 27, 2023 | 03:39 PM
arvind kejriwal

arvind kejriwal

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर आणखी एक अडचण आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीवर झालेल्या खर्चाचे कॅग ऑडिट होणार आहे. एलजीच्या शिफारशीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने कॅग ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सीएम केजरीवाल यांच्या निवासस्थानावर झालेल्या खर्चाबाबत एक स्टिंग ऑपरेशन समोर आले होते.असे सांगण्यात आले की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात 8-8 लाख रुपयांचा पडदा लावण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बसवण्यात आलेल्या पडद्यांवर एकूण एक कोटी रुपये खर्च करण्यात आले. एकूण 23 पडदे मागवण्यात आल्याचे अहवालात सांगण्यात आले. याबाबत दिल्ली भाजपने आम आदमी पक्षाला घेरले. सीएम केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानावर बसवलेला मार्बल व्हिएतनाममधून आयात करण्यात आल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. या डायर पर्ल मार्बलची किंमत एक कोटी १५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी ४५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

‘आप’ने स्पष्टीकरण दिले होते
या संपूर्ण प्रकरणावर आम आदमी पक्षाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आपचे खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते राघव चढ्ढा म्हणाले होते की, केजरीवाल राहतात ते घर 1942 मध्ये बांधले गेले होते. चढ्ढा म्हणाले की, घराच्या आतील छतापासून बेडरूमपर्यंत पाणी टपकत असे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) त्याचे ऑडिट करण्यात आले. त्यांनी सांगितले की हा सरकारी बंगला आहे. इतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याशीही तुलना केली पाहिजे. सीएम शिवराज यांच्या निवासस्थानाला चुना लावण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे आपच्या प्रवक्त्याने म्हटले होते. पीएम मोदींचे निवासस्थान बांधले जात आहे, ज्याचा अंदाजे खर्च 500 कोटी आहे. ही रक्कम दुप्पट किंवा त्याहूनही जास्त असू शकते.

Web Title: Arvind kejriwals troubles increase a cag audit will be conducted for the renovation of the bungalow nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2023 | 03:39 PM

Topics:  

  • arvind kejariwal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.