Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बलात्कार प्रकरणी स्वयंघोषित संत आसाराम बापू दोषी; आधीच तुरुंगात असलेल्या आसाराम बापूंना आज सुनावली जाणार आणखी एक शिक्षा

आधीच एका प्रकरणात आसाराम बापू हा बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या जोधपूर येथील तुरुंगात आसाराम बापू शिक्षा भोगत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टात त्याने जामीन अर्ज दाखल केला होता.

  • By साधना
Updated On: Jan 31, 2023 | 08:17 AM
बलात्कार प्रकरणी स्वयंघोषित संत आसाराम बापू दोषी; आधीच तुरुंगात असलेल्या आसाराम बापूंना आज सुनावली जाणार आणखी एक शिक्षा
Follow Us
Follow Us:

स्वयंघोषित संत आसाराम बापूविषयीची (Asaram Bapu) मोठी बातमी समोर आली आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणाता दोषी आढळला आहे. गुजरातमधील (Gujrat) गांधीनगर सत्र न्यायालयाने (Gandhinagar Session Court) आसाराम बापू दोषी असल्याचा निकाल दिला आहे. आज या प्रकरणात आसाराम बापूला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आसाराम बापू हा मोठा अध्यात्मिक गुरू होता. आसारामच्या सत्संगमध्ये अनेक राजकीय मंडळीसुद्धा यायचा

सूरतमधील एका तरुणीवर 2013 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर लावण्यात आला होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केला असल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामशिवाय, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा असे आरोपी आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी असल्याचे जाहीर केले. मात्र, शिक्षा आज, मंगळवारी सुनावणार असल्याचे सांगण्यात आले.

सूरत बलात्कार प्रकरणात आसाराम बापूच्या पत्नीसह इतर सहा आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, आसाराम बापूने 2001 ते 2006 दरम्यान पीडितेवर खूपदा अत्याचार केला होता. ही पीडिता शहराबाहेरील एका आश्रमात वास्तव्यास होती.

अडचणी वाढल्या
आधीच एका प्रकरणात आसाराम बापू हा बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या जोधपूर येथील तुरुंगात आसाराम बापू शिक्षा भोगत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टात त्याने जामीन अर्ज दाखल केला होता. वाढते वय आणि ढासळती प्रकृती यामुळे जामीन मंजूर करण्याची विनंती आसारामने केली होती. मात्र, प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता कोर्टाने जामीन मंजूर केला नाही. त्यामुळे एका प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असताना आता दुसरीकडे आणखी एका प्रकरणात आसाराम दोषी आढळला आहे.

देशभरात आसारामचे 400 पेक्षा जास्त आश्रम आणि 40 शाळा आहेत. आता हे संपूर्ण नेटवर्क आसारामची मुलगी भारती सांभाळत आहे. आसारामच्या अटकेननंतर वडील आसाराम बापूच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत आहे.

Web Title: Asaram bapu found guilty in rape case by gandhinagar court nrsr another hearing punishment give to asaram bapu today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2023 | 07:45 PM

Topics:  

  • asaram bapu
  • Gujrat

संबंधित बातम्या

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप
1

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप

भारताच्या या राज्यात वसलंय भगवान शिवाचे अनोखे मंदिर, दिवसातून दोनदा पाण्यात होते गायब…
2

भारताच्या या राज्यात वसलंय भगवान शिवाचे अनोखे मंदिर, दिवसातून दोनदा पाण्यात होते गायब…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.