Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess Championship : राष्ट्रीय स्पर्धेच्या तिकिटासाठी 387 बुद्धिबळपटूंचा बुद्धीसंग्राम; उद्यापासून दुसरा टप्पा

Chess Championship : एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा टप्पा 13 नोव्हेंबरपासून दहिसरमध्ये सुरू होणार. 387 खेळाडूंचा सहभाग असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड आणि 60 हजारांची पारितोषिके हे प्रमुख आकर्षण.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 12, 2026 | 03:51 PM
Chess Championship : राष्ट्रीय स्पर्धेच्या तिकिटासाठी 387 बुद्धिबळपटूंचा बुद्धीसंग्राम; उद्यापासून दुसरा टप्पा

Chess Championship : राष्ट्रीय स्पर्धेच्या तिकिटासाठी 387 बुद्धिबळपटूंचा बुद्धीसंग्राम; उद्यापासून दुसरा टप्पा

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 
  • सहा गटांत रंगणार चुरस; ६० हजारांची पारितोषिके
  • 17 वर्षांखालील गटातही रंगतदार सामना
 

Chess Championship : राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न उराशी बाळगून राज्यातील शालेय बुद्धिबळपटू सज्ज झाले आहेत. एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा टप्पा शुक्रवार, 13 नोव्हेंबरपासून दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत तब्बल 387 खेळाडूंचा सहभाग असून, राष्ट्रीय स्पर्धेतील स्थान मिळवण्यासाठी सहाही गटांत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.

इंडियन चेस स्कूलच्या वतीने आयोजित या स्पर्धेत 9, 13 आणि 17 वर्षांखालील मुले व मुली अशा सहा फिडे मानांकित गटांत सामने खेळविण्यात येतील. प्रत्येक गटातील पहिल्या दोन क्रमांकांच्या खेळाडूंना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 9 वर्षांखालील खुल्या गटात 110, मुलींच्या गटात 56, 13 वर्षांखालील खुल्या गटात 123, मुलींच्या गटात 45, 17 वर्षांखालील खुल्या गटात 38, तर मुलींच्या गटात 15 खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या दोन्ही टप्प्यांतील एकूण खेळाडूंची संख्या 804 वर पोहोचली आहे. पहिला टप्पा 4 ते 6 नोव्हेंबरदरम्यान पार पडला असून, त्यात 417 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

9 वर्षांखालील गटात अध्वान, गार्गीला अग्रमानांकन

9 वर्षांखालील खुल्या गटात अध्वान ओसवाल (1724) याला अग्रमानांकन मिळाले आहे. ईशान अग्निहोत्री (1618) आणि निहांश खोडे (1572) हे अनुक्रमे दुसरे आणि तिसरे मानांकित खेळाडू आहेत. आरव झावर (1571) आणि पहिल्या टप्प्यात 7 वर्षांखालील खुल्या गटाचे विजेतेपद पटकावणारा इवान दुबे (1545) यांच्याकडूनही कडवी झुंज अपेक्षित आहे.

9 वर्षांखालील मुलींच्या गटात नागपूरच्या गार्गी हरकरे (1568) हिला अग्रमानांकन देण्यात आले आहे. लिया कृष्णन (1558) आणि दीधिती बॅनर्जी (1553) या तिच्या प्रमुख प्रतिस्पर्धी असतील. पहिल्या टप्प्यात 7 वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवणाऱ्या लिया कृष्णनकडेही विशेष लक्ष असेल. इशी सिंग (1538) आणि मिराई सरदाना (1533) यांच्यामुळे या गटातील चुरस आणखी वाढणार आहे.

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पुन्हा पावसाचा ‘खेळ’? चौथा वनडे रद्द होणार? पाहा Weather Report

13 वर्षांखालील गटात निर्वाण, त्वेषाकडून अपेक्षा

13 वर्षांखालील खुल्या गटात सर्वाधिक 123 खेळाडू सहभागी होणार आहेत. निर्वाण शाह (1956) याला अग्रमानांकन मिळाले असून, ओम रामगुडे (1906) आणि विहान राव (1826) हे त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी ठरणार आहेत.

मुलींच्या 13 वर्षांखालील गटात त्वेषा जैन (1697) हिला अग्रमानांकन मिळाले आहे. इहिना अय्यर (1566), निश्का अग्रवाल (1562) आणि तिस्या भट्ट (1524) या तिच्यासमोर आव्हान उभे करतील. पहिल्या टप्प्यात 11 वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावणाऱ्या त्वेषाकडून पुन्हा दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

IPL 2027: वादाला आमंत्रण! यावर्षी चक्क बांगलादेशचे ७ खेळाडू लिलावात; कहर म्हणजे मुस्तफिजुरही सहभागी

17 वर्षांखालील गटातही रंगतदार मुकाबला

17 वर्षांखालील खुल्या गटात आर्य बागायतकर (1742) याला अग्रमानांकन मिळाले आहे. युवराज सिंग (1690), सोहम सहमाते (1667) आणि दैविक मेहता (1642) हे त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी असतील.

मुलींच्या 17 वर्षांखालील गटात दृष्या नाईक (1713) ही सर्वोच्च मानांकित खेळाडू आहे. हिमांशी तेंडुलकर (1530), इक्षा सोनी (1528) आणि त्रिशा जगताप (1527) यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

60 हजारांची पारितोषिके; राष्ट्रीय स्पर्धेचे लक्ष्य

अहमदाबाद येथे 16 ते 20 डिसेंबर 2026 या कालावधीत राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेतील सहाही गटांमधील पहिल्या दोन क्रमांकांच्या खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्यामुळे विजेतेपदासोबतच राष्ट्रीय स्पर्धेचे तिकीट मिळवण्यासाठीही प्रत्येक डाव महत्त्वाचा ठरणार आहे.

स्पर्धेसाठी एकूण 60 हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक गटासाठी 10 हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांच्या खेळाडूंना एसबीआय लाइफ चषक, तर चौथ्या ते दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.

सात फेऱ्यांच्या या स्पर्धेचे संचालन मुख्य पंच आंतरराष्ट्रीय पंच पी. बी. भिलारे यांच्या देखरेखीखाली होणार आहे. स्पर्धेला एसबीआय लाइफचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून, रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल हे स्थळ भागीदार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार आहे?

    Ans: दुसरा टप्पा शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार असून, ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे.

  • Que: स्पर्धेत किती खेळाडू सहभागी होणार आहेत?

    Ans: दुसऱ्या टप्प्यात 387 खेळाडू सहभागी होणार आहेत. दोन्ही टप्प्यांतील एकूण खेळाडूंची संख्या 804 आहे.

  • Que: स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे

    Ans: दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्पर्धा होणार आहे.

Web Title: Maharashtra state school chess championship second stage 2026 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Chess Championship
  • Gujrat
  • SBI

संबंधित बातम्या

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न
1

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न

Asaduddin Owaisi :  महाराष्ट्रात UCC नव्हे, हिंदू सिव्हिल कोड लागू करण्याचा डाव; ओवैसींचा फडणवीस सरकारवर आरोप
2

Asaduddin Owaisi : महाराष्ट्रात UCC नव्हे, हिंदू सिव्हिल कोड लागू करण्याचा डाव; ओवैसींचा फडणवीस सरकारवर आरोप

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न
3

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न

Chess Tournament : इवान दुबेची सातही डावांत शंभर नंबरी कामगिरी
4

Chess Tournament : इवान दुबेची सातही डावांत शंभर नंबरी कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.