Bageshwar Dham Dhirendra Shastri Meets Premanand Maharaj in Vrindavan News Update
Premanand Maharaj Dhirendra Shastri meet: मधुरा : बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे नेहमी चर्चेत असतात. पण आता त्यांनी वृंदावनमधील गुरु प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अचानक वृंदावनात येत प्रेमानंद महाराजांची भेट घेतल्याने चर्चा रंगली आहे. त्यांची ही भेट कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी नव्हती, तर प्रेमानंद महाराजांशी वैयक्तिक भेटीसाठी होती. वृंदावनात पोहोचल्यानंतर, धीरेंद्र शास्त्री यांनी थेट आश्रमात जात प्रेमानंद महाराजांची भेट घेतली.
तब्येतीची विचारपूस करत घेतले आशिर्वाद
धीरेंद्र शास्त्री यांनी प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. प्रकृती बिघडली असूनही, प्रेमानंद महाराज त्यांच्या दैनंदिन समाजसेवेत आणि प्रवचनांमध्ये व्यस्त राहतात. धीरेंद्र शास्त्री यांनी विशेषतः त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी प्रेमानंद महाराजांसोबत वेळ देखील घालवला. प्रेमानंद महाराज देखील अगदी आपुलकीने धीरेंद्र शास्त्रींसोबत बोलत होते. त्यांचे दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी त्यांच्या खास शैलीत उपस्थित सर्वांचे अभिवादन स्वीकारले. त्यांनी हात जोडून आणि स्मितहास्य करून सर्व भक्तांचे आभार मानले. दोन्ही प्रमुख धार्मिक नेत्यांमधील ही वैयक्तिक भेट धर्म आणि अध्यात्माच्या जगासाठी एक महत्त्वाची घटना मानली जात आहे. या भेटीदरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी महाराजांशी त्यांच्या सनातन एकता पदयात्रेबद्दल चर्चा केली. त्यांनी त्यांना सांगितले की ते दिल्ली ते वृंदावन अशी पदयात्रा करतील, जी ७ ते १६ नोव्हेंबर दरम्यान पूर्ण होईल. या बैठकीनंतर संत प्रेमानंद महाराज म्हणाले की, “सनातनशिवाय कोणाकडेही शक्ती नाही. कोणीही कुठेही असो, सर्वांना सनातनशी जोडले जावे लागेल,” असे प्रेमानंद महाराज म्हणाल आहेत.
प्रेमानंद महाराज जी ने धीरेंद्र शास्त्री को धर्म की शिक्षा दी है, अब देखना होगा कि धीरेंद्र शास्त्री जी इसे जीवन में उतारते हैं या नहीं। pic.twitter.com/bNQjs3wt2j — Jaiky Yadav (@JaikyYadav16) October 14, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रेमानंद महाराज म्हणाले की, “सनातन सूर्य आहे, सनातन वायु आहे , सनातन आकाश आहे, सनातन ही भूमी आहे. हवेशी संबंध जोडणे, सूर्यप्रकाशात राहणे, आकाशाखाली राहणे आणि पृथ्वीवर राहणे हेच सनातन आहे. ब्रह्माचे स्वरूप सनातन आहे. सनातन कोणत्याही व्यक्तीने स्थापित केलेले नाही; ते स्वयंअस्तित्वात आहे. ज्याप्रमाणे वेद स्वयंअस्तित्वात आहेत, तसेच ते देखील शाश्वत आहे,” असे संत प्रेमानंद महाराज म्हणाले आहेत. गळ्यामध्ये राधा नाम घातलेल्या धीरेंद्र शास्त्री यांचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.