Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025: नवभारत वृत्त समूहाच्यावतीने नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल-एस्टेट कॉन्क्लेव्ह २०२५ चे (Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025) मुंबईतल्या विक्रोळी येथील हॉटेल ताज द ट्रिझ् येथे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई शहराचा कायापालट कशाप्रकारे होणार यासंदर्भातील माहिती दिली.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यानंतर विकास कामांना चालना मिळाली. वर्ष 2005 ते वर्ष 2010 मध्ये कोस्टल रोडची संकल्पना ठेवण़्यात आली होती. तर 1999 ते 2014 या वर्षात वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर एकच मेट्रो धावत होती. मात्र नरेंद्र मोदींच्या काळात म्हणजेच 2014 ते 2025 पर्यंत 356 किलोमीटर मेट्रोची कामे सुरु आहेत. मुंबईचा विकास आत्तापर्यंत दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरातील अंधेरीसारखा भाग व त्यानंतर मागील काही वर्षांत ठाणे, नवी मुंबई असा केंद्रित राहिला आहे. आता विकासाचा ओघ महामुंबई क्षेत्रातील नव्या विकास केंद्रांपर्यंत नेण्यात येणार आहे,अशी माहिती नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल-एस्टेट कॉन्क्लेव्ह २०२५ कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘मुंबई वन’ अॅप लाँच केले. या अॅपमुळे मुंबईत प्रवास करणे खूप सोपे होईल. आता तुम्ही एकाच अॅपवरून मेट्रो, मोनोरेल, लोकल ट्रेन, बस आणि टॅक्सीची तिकिटे खरेदी करू शकाल. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) प्रवास करणे पूर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर होईल.
हे अॅप कार्यान्वित झाले असून प्रवासी अॅप डाउनलोड करू शकतात आणि एकच डायनॅमिक क्यूआर कोड तयार करू शकतात. हा क्यूआर कोड तुमचा संपूर्ण मल्टी-मॉडल प्रवास कव्हर करेल. याचा अर्थ असा की तुम्ही मेट्रो, मोनोरेल, लोकल ट्रेन आणि बसने प्रवास करत असलात तरी एकच तिकीट पुरेसे असेल. हे अॅप ११ वेगवेगळ्या वाहतूक अधिकाऱ्यांसाठी काम करेल. त्याचबरोबर या अॅपमध्ये सागरी वाहतूकीचाही समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती अमित साटम यांनी दिली.
मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून अरबी समुद्रात वांद्रे वर्सोवा सागरी सेतू उभारला जात आहे. या 17 किलोमीटर लांब सागरी सेतूच्या उभारणीचे काम 2018 पासून हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार सागरी मार्गावर एकूण ८ मार्गिका बांधल्या जाणार आहेत. यातील मुख्य सागरी सेतू ९.६० किमी लांबीचा असून, तो समुद्रात ९०० मीटर आतमध्ये उभारला जाणार आहे. हा वांद्रे वर्सेवा सी लिंक येत्या तीन वर्षात पूर्ण होणार आहे, अशी माहिती अमित साटम यांनी दिली.