सहारनपूर: उत्तरप्रदेशच्या सहारनपूर (Saharanpur) जिल्ह्यात असलेल्या दारुल उलूम देवबंद (Darul Uloom Deoband) या प्रसिद्ध इस्लामिक शैक्षणिक संस्थेच्या प्रशासनाने एक आदेश जारी करून संस्थेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दाढी न कापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दारुल उलूम देवबंदच्या शिक्षण विभागाचे प्रभारी मौलाना हुसेन अहमद (Maulana Hussain Ahmed) यांनी सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की संस्थेत शिकणारा कोणताही विद्यार्थी दाढी काढणार नाही आणि जर त्याने तसे केले तर त्याला बाहेर काढण्यात येईल.
[read_also content=”दिल्लीत हत्याचं सत्र काही थांबेना! ड्रग्ज घेताना रंगेहात पकडलं म्हणून तरुणाने लिव्ह इन पार्टनरला जिवंत जाळलं https://www.navarashtra.com/crime/a-women-sets-on-fire-by-her-live-in-partner-in-delhi-nrps-371181.html”]
दाढी कापून संस्थेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. संस्थेच्या सूत्रांनी सांगितले की, यापूर्वी ६ फेब्रुवारीला दाढी केल्यामुळे चार विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले होते. यापुर्वीही दारुल उलूम देवबंदने तीन वर्षांपूर्वी दारूल इफ्ता विभागात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात फतवा जारी केला होता, ज्यामध्ये दाढी कापणे इस्लाममध्ये हराम असल्याचे म्हटले होते.
[read_also content=”‘भाऊ बहिणीमधील लैगिंक संबध’ या विषयावर निबंध लिहा! प्राध्यपकाने विद्यार्थांने दिला अजब टास्क, पाकिस्तानचं नाव पुन्हा खराब https://www.navarashtra.com/world/pakistani-lecturerasked-students-to-write-an-essay-on-physical-relation-between-brother-and-sister-nrps-371199.html”]
दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वरिष्ठ सदस्य आणि लखनऊचे शहर काझी मौलाना खालिद रशीद फरंगी महाली म्हणाले की, रसूल अल्लाह मुहम्मद दाढी ठेवायचे, म्हणून दाढी ठेवणे इस्लाममध्ये ‘सुन्नत’ आहे. ते म्हणाले की, [blurb content=””]