Bihar Assembly Election 2025: बिहारच्या विधासभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात होती. यात पहिलया टप्प्यात ६ नोव्हेंबरला मतदान होती. तर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील. पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांवर मतदान होणार आहे.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, सध्या बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार आहेत. बिहारमध्ये एकूण ९०,७१२ मतदान केंद्रांसह १४ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण १४ लाख नवीन मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये एकूण ९०,७१२ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
Bihar Election 2025 : बिहारमधील ‘या’ विद्यमान आमदारांचे तिकिटे भाजप रद्द करू शकते, वाचा संपूर्ण यादी
ज्ञानेश कुमार म्हणाले, राज्याच्या विधानसभेच्या राज्यात एकूण २४३ जागा आहेत. यात सर्वसाधारण जागा – २०३, जमातीच्या जागा – ०२, अनुसूचित जातीच्या जागा – ३८ या पद्धतीने जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. निवडणुकीदरम्यान कोणत्याही अनियमिततेची थेट तक्रार करता येते, त्यासाठी त्यांनी एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
ज्ञानेश कुमार म्हणाले, जर एखाद्याचे नाव वगळले गेले तर तो नामांकनाच्या १० दिवस आधीपर्यंत त्याचे नाव जोडू शकतो. बिहारमध्ये ३९.२ लाख पुरुष मतदार आणि ३४ लाख महिला मतदार आहेत. बिहारमध्ये १४ लाख पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. १४,००० मतदार १०० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. प्रत्येक बूथवर वेबकास्टिंग केले जाईल. प्रत्येक केंद्रावर १,२०० पेक्षा जास्त मतदार नसतील.
संजय कपूरच्या बहिणीचा गंभीर आरोप म्हणाली, ”करिश्मा कपूरचा संसार उद्ध्वस्त..”
अपंगांसाठी फॉर्म २० द्वारे घरी मतदान करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. बिहार निवडणुकीसाठी ९०,४१२ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदान कक्षांच्या बाहेर मोबाईल केंद्रे असतील. मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेता येतील. मतदान नोंदणीच्या १५ दिवसांच्या आत मतदार कार्ड जारी केले जातील.
मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक यंत्रणा आता केवळ एका फोन कॉलच्या अंतरावर आणली आहे. बिहारमध्ये एकूण ९०,७१२ बीएलओ, २४३ ईआरओ आणि ३८ डीईओ नियुक्त करण्यात आले असून, मतदारांना त्यांच्याशी थेट संपर्क साधणे शक्य झाले आहे.
मतदार १९५० (मतदार हेल्पलाइन) वर कॉल करून विविध निवडणूक संबंधित माहिती मिळवू शकतात. यासाठी फक्त +९१-एसटीडी कोड-१९५० असा क्रमांक डायल करावा लागेल. उदाहरणार्थ, पाटणा जिल्ह्यासाठी क्रमांक असेल +९१-६१२-१९५०. याशिवाय, मतदार ECINet अॅप च्या माध्यमातून त्यांच्या संबंधित बीएलओंशी थेट संवादासाठी कॉल बुक करू शकतात.