(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दिवंगत उद्योजक संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये तब्बल ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून मोठा वाद उफाळून आला आहे. या वादात आता एक खळबळजनक ट्विस्ट आला असून संजय कपूर यांच्या बहिणीने, मंदिरा कपूर स्मिथ हिने प्रिया सचदेव हीच्यावर गंभीर आरोप केलं आहेत.
एका मुलाखतीत मंधीराने दावा केला की, प्रिया सचदेवमुळेच संजय कपूर आणि त्यांची दुसरी पत्नी, अभिनेत्री करिश्मा कपूर यांचं वैवाहिक आयुष्य उध्वस्त झालं. मंधीरा म्हणाली की, “संजय आणि करिश्मा यांच्या लग्नाच्या काळात प्रिया संजयला सतत मेसेज करत होती. मला हे ठाऊक आहे, कारण मी स्वतः अनुभवलं आहे.”
पुढे मंदिरा म्हणाली, ‘संजय आणि करिश्मा त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी होते. दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरु होतं आणि कियान याचा जन्म झालेला होता. तेव्हा संजय याच्या आयुष्यात प्रिया हिची एन्ट्री झाली. दोघांची भेट विमानात झाली होती’ प्रिया हिच्यावर आरोप करत मंदिरा म्हणाली, ‘जर तुला माहिती होतं की, त्या पुरुषाला दोन मुलं आहे… त्याचा संसार सुरळीत करण्याऐवजी, तू त्याचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतेय… लोलो( करिश्मा) सोबत असं व्हायला नको होतं…’
स्त्रीशक्तीचा उत्सव होणार साजरा, “लग्न आणि बरंच काही” चित्रपटातून दिसणार ‘महिलाराज’!
मंदिराने सांगितले की, सर्वजण संजय आणि प्रियाच्या नात्याविरुद्ध होते. माझे वडील प्रिया संजय यांच्या विरोधात होते. वडिलांचं म्हणणं होतं, संजय प्रिया हिच्यासोबत लग्न करू शकत नाही आणि मुल देखील जन्माला घालू शकत नाही… पण असं असताना मी माझ्या भावाजी बाजू घेतली. कारण मी त्याच्यावर प्रचंड प्रेम करत होती. ‘
मंदिरा पुढे म्हणाली, ‘मी आणि करिश्मा चांगल्या मैत्रिणी होतो. पण त्या वेळी मी करिश्माची साथ दिली नाही. त्याचा मला आजही पश्चाताप होतो. मला करिश्माच्या बाजूने उभं राहायला हवं होतं.’ असं देखील मंदिरा म्हणाली.
2003 मध्ये संजय याने करिश्मा हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. पण दोघांचं नातं दोन मुलांच्या जन्मानंतर देखील फार काळ टिकलं नाही. घटस्फोटाच्या दरम्यान दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. अखेर 2016 मध्ये करिश्मा आणि संजय यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर 2017 मध्ये संजय याने प्रिया हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे…