Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Assembly Election Result: नितीश कुमार नसतील बिहारचे नवे मुख्यमंत्री? पंतप्रधान मोदींचे सूचक विधान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेले नितीश कुमार पुन्हा एकदा ध्रुवताऱ्यासारखे उदयास आले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 27, 2025 | 05:37 PM
Bihar Assembly Election Result: नितीश कुमार नसतील बिहारचे नवे मुख्यमंत्री? पंतप्रधान मोदींचे सूचक विधान
Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष
  • नितीश कुमार हे बऱ्याच काळापासून बिहारचे मुख्यमंत्री
  • चिराग पासवान यांची नितीश कुमार यांच्याशी भेट
Bihar Assembly Election Result:  बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजप आणि जेडीयुच्या विजयानंतर आता बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वीस वर्षांपासून बिहारमध्ये नितीश कुमार यांची सत्ता होती. यंदाच्या निवडणुकादेखील नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात लढवण्यात आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला ८९ जागा मिळाल्या तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला ८५ जागा मिळाल्या.

बिहार निवडणुकांनंतर आता बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री असेल. त्यांनी हे विधान एका निवडणूक सभेत केल आहे. नितीश कुमार हे बऱ्याच काळापासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. आता बिहारमधील जनता त्यांचा नेता कोणाला निवडते हे पाहायचे आहे. असं पंतप्रधान मोदी यांनी एका निवडणूक सभेत म्हटलं होतं.

BJP RK Singh Suspension : NDA च्या विजयानंतर भाजप सरकारचा मोठा निर्णय, आरके सिंग यांना पक्षातून केले निलंबित

बिहारमध्ये एनडीएच्या प्रचंड विजयानंतर, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी एनडीएच्या विजयाचे वर्णन “सुशासनाचा विजय” असे केले आहे. हे विधान नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सततच्या कार्यकाळाचे समर्थन म्हणून पाहिले जात आहे.

बिहारमध्ये एनडीएच्या प्रचंड विजयानंतर, मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे “नितीश त्यांच्या समर्थकांमध्ये ‘सुशासन बाबू’ म्हणून लोकप्रिय आहेत आणि गेल्या २० वर्षांत कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास सुधारून बदल घडवून आणल्याचा दावा करतात. हा बिहारच्या विकासाचा विजय आहे. जनहिताच्या भावनेचा विजय आहे.” सामाजिक न्याय जिंकला आहे.’ अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं आहे.

नीतीश कुमार यांचे अभिनंदन

बिहार निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढील कार्यकाळाबाबतही प्रतिक्रिया देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी सर्व एनडीए नेत्यांचे त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाबद्दल अभिनंदन करतो.” त्याच वेळी त्यांनी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याचेही नमूद केले. यावेळी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपने ८९, जेडीयूने ८५, एलजेपी (आर) ने १९, एचएएमने ५ आणि आरएलएमने ४ जागा जिंकल्या. निकालानंतर विरोधकांकडून असा दावा सातत्याने करण्यात येत आहे की भाजप, नीतीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणार नाही.

Bihar Election Result: बिहारमध्ये दोन दशकांत राजकीय समीकरणे कशी बदलली? भाजप-जेडीयूच्या विजयाची १५ कारणे

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेले नितीश कुमार पुन्हा एकदा ध्रुवताऱ्यासारखे उदयास आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेत्यांची सतत ये-जा सुरू असून नवीन समीकरणांबाबतच्या चर्चांना अधिक वेग आला आहे. नितीश कुमार आपल्या विश्वासू सहकाऱ्यांसोबत सलग बैठका घेत आहेत. मात्र, बिहारचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलची अनिश्चितता अद्याप कायमच आहे.

चिराग पासवान यांची नितीश कुमार यांच्याशी भेट

शनिवारी सकाळी चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या निवासस्थानी भेट दिली. बैठकीनंतर ते म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो. आमच्या उमेदवारांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठिंबा मिळाला आणि आम्हीही अलौलीमधील जेडीयू उमेदवाराला समर्थन दिले,” अशी माहिती त्यांनी दिली. पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न विचारला असता चिराग पासवान मात्र मौन बाळगत “या विषयावर सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल,” अशी प्रतिक्रीया दिली.

 

Web Title: Bihar assembly election result nitish kumar will not be the new chief minister of bihar pm modis suggestive statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • bihar assembly election 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.