Bihar Election 2025: बिहार जिंकण्यासाठी नितीश कुमारांनी काढले रामबाण 'अस्त्र' नागरिकांना देणार असे गिफ्ट; लागेल झटका
पाटणा: लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या वर्षाअखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे बिहारमधील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बिहारमध्ये आता नागरिकांना वीज मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री नितिश कुमारांनी केली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये १२५ युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. याआधी बिहार सरकारने मोफत वीज देण्याच्या बातम्यांना नाकारले होते. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. मध्यमवर्ग आणि ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी घेतल्याचे म्हटले जात आहे.
विरोधी पक्षातील नेते तेजस्वी यादव यांनी देखील महागठबंधंन सरकार सत्तेत आल्यास २०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. तेजस्वी यादव यांच्या या आश्वासनानंतर बिहारमधील सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी १२५ युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतःउन याबाबत घोषणा केली आहे.
काय म्हणाले नितीश कुमार?
आम्ही आधीपासूनच सर्वाना कमी दरात वीज उपलब्ध करून देत आहोत. आता आम्ही १ ऑगस्टपासून १२५ युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने राज्यातील १ कोटी ६७ लाख कुटूंबाना फायदा होणार आहे.पुढील तीन वर्षांत, या सर्व घरगुती ग्राहकांची संमती घेतल्यानंतर, त्यांच्या घरावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून लाभ दिला जाणार आहे.
बिहार जिंकण्यासाठी नितीश कुमारांनी खेळला मोठा डाव
बिहारमध्ये आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्य मंत्रीमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. बिहारच्या मूळ रहिवाशी असलेल्या महिलांना रंजीतील सर्व सरकारी नोकरी, संवर्ग आणि पदांवर थेट नियुक्तीमध्ये 35 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. हे आरक्षण सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू असणार आहे. तसेच नितीश कुमार यांनी बिहार राज्य युवा आयोगाच्या स्थापनेला देखील मंजूरी दिली आहे.
पटणा येथे राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये हा निनरया मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे. या बैठकीत 43 गोष्टींना मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबत माहिती देत आहे.
बिहारमध्ये मतदारयादीत मोठे फेरफार
बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. या निवडणुकांच्य पार्श्वभूमीवर बिहारमध्ये सध्या ‘विशेष गहन पुनरावलोकन’ (Special Intensive Revision – SIR) प्रक्रिया सुरू आहे. पण या प्रक्रियेवरच विरोधी इंडिया आघाडीने विरोध केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या प्रक्रियेविरोधात विरोधी पक्षांच्या संयुक्त प्रतिनिधीमंडळाने बुधवारी (२ जुलै) केंद्रीय निवडणूक आयोगाची भेटीची वेळ मागितली होती. पण सुरूवातील आयोगाने इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळास वेळ देण्यास नकार दिला. या नकारानंतर विरोधी पक्षांकडून दबाव आल्याने निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांना भेटीची वेळ निश्चित केली. निवडणूक आयोगाच्या भेटीत इंडिया आघाडीच्या ११ पक्षांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली.