Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election 2025: जागावाटपावरुन फिस्कटणार महाआघाडीचा खेळ? १३० जागांवर RJDचा दावा तर, काँग्रेसच्या वाट्याला किती?

काँग्रेस सुमारे ७० ते ७५ जागांवर दावा करण्याच्या तयारीत आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार राजद काँग्रेसला ४८ पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याचे समजते. तरीही काँग्रेसला सुमारे ५५ जागा मिळतील, अशी आशा व्यक्त केली जा

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 07, 2025 | 03:43 PM
Bihar Assembly Election 2025:

Bihar Assembly Election 2025:

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा
  • विविध पक्षांमध्ये बैठका सुरू
  • राजदमध्ये २-३ जागांवर अजूनही चर्चा

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. निवडणुकांच्या दृष्टीने महाआघाडीची तयारी सुरू झाली आहे. महाआघाडीतील जागावाटप अद्याप निश्चित झालेले नसले तरी, त्यादृष्टीने महाआघाडीच्या हालचाली सुरू आहेत. विविध पक्षांमध्ये बैठका सुरू आहेत. तेजस्वी यादव देखील जागावाटपांच्या समीकरणांवर काम करत आहेत. अशातच महाआघाडीचा जागावाटपाचा एक नवा फॉर्म्युला समोर आला आहे. माहितीनुसार, काँग्रेसबाबत अद्याप कोणताही विचार करण्यात आलेला नसल्याचे बोलले जात आहे.

Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर

महागठबंधनात जागावाटपाचे संकेत

सहानींना १८ ते २० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसने ७० जागांवर निवडणूक लढवली होती; मात्र यावेळी पक्षाला फक्त ५० ते ५५ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आरजेडी १२५ ते १३० जागा राखण्याच्या तयारीत असून, डाव्या पक्षांना ३० ते ३५ आणि व्हीआयपीला १८ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे. आरएलजेपीला ३ ते ४, तर झामुमोला २ ते ३ जागा मिळू शकतात. व्हीआयपीला अपेक्षित १८ ते २० जागा मिळाल्यास, पक्ष मजबूत स्थितीत राहील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सूत्रांनुसार, काँग्रेसने आगामी निवडणुकीसाठी जागावाटपाचा एक नवीन फॉर्म्युला तयार केला आहे.

या फॉर्म्युल्यानुसार —

अ श्रेणी : काँग्रेसकडे सध्या असलेल्या १९ जागांचा समावेश.

ब श्रेणी : मागील निवडणुकीत ५,००० ते १०,००० मतांनी पराभूत झालेल्या जागा.

क श्रेणी : १०,००० ते १५,००० मतांनी पराभूत झालेल्या जागा.

ड श्रेणी : १५,००० ते २०,००० मतांनी पराभूत झालेल्या जागा.

या गणनेनुसार काँग्रेस सुमारे ७० ते ७५ जागांवर दावा करण्याच्या तयारीत आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार राजद काँग्रेसला ४८ पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याचे समजते. तरीही काँग्रेसला सुमारे ५५ जागा मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

CJI Bhushan Gavai Attack: मोहन भागवतांचे ते वक्तव्य अन् चार दिवसांतच भूषण गवईंवर हल्ला

अनेक आमदारांचे तिकीट कापले जाणार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजदमध्ये २-३ जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे. यावेळी राजदच्या अनेक आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी म्हणाले की, महाआघाडीतील जागावाटप अंतिम झाले आहे. जर महाआघाडीने सरकार स्थापन केले तर ते उपमुख्यमंत्री असतील, असा दावा साहनींकडून सातत्याने केला जात आहे. हा काँग्रेससाठी देखील एक धक्का आहे. दुसरा संभाव्य पर्याय म्हणजे काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री नियुक्त करणे. महाआघाडीतील जागावाटपाची व्यवस्था अंतिम केली जाईल आणि एक-दोन दिवसांत त्याची घोषणा केली जाईल असे मानले जाते.

Web Title: Bihar election 2025 new formula for seat sharing of maha aghadi in bihar how many seats will congress get

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • bihar assembly election 2025

संबंधित बातम्या

Bihar Assembly Election 2025: चिराग पासवान बिघडवणार भाजपचं गणित? बिहारमध्ये नव्या युतीचे संकेत
1

Bihar Assembly Election 2025: चिराग पासवान बिघडवणार भाजपचं गणित? बिहारमध्ये नव्या युतीचे संकेत

Bihar Assembly Election 2025: NDA मजबूत असलेल्या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान; तर महाआघाडी दोन गटात विभागली
2

Bihar Assembly Election 2025: NDA मजबूत असलेल्या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान; तर महाआघाडी दोन गटात विभागली

Bihar Assembly Election 2025: ठरलं तर! ‘या’ दिवशी होणार बिहार विधानसभेच्या निवडणुका
3

Bihar Assembly Election 2025: ठरलं तर! ‘या’ दिवशी होणार बिहार विधानसभेच्या निवडणुका

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; निवडणूक आयोगाने उचलले मोठा निर्णय
4

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; निवडणूक आयोगाने उचलले मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.