मोहन भागवतांचे ते वक्तव्य अन् चार दिवसांतच भूषण गवईंवर हल्ला
सरकार आणि प्रशासनाकडून समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासकीय प्रक्रियांचा अभाव यांमुळे जनतेचा असंतोष वाढण्याची काहीप्रमुख कारणे आहेत. पण हिंसत आंदोलन हा पर्याय असू शकत नाहीत. आपले शेजाही देश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडलेले आहेत. भारताच्या हितासाठी या देशांमध्ये शांतता, स्थिरता, प्रगती होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले होते.
भागवत म्हणाले होते की, गेल्या हजारो वर्षांपासून काही परदेशी लोक भारतात आले, त्यांच्यासोबत ते सांप्रदायही भारतात आले. आता हे लोक निघून गेल असले तर आपल्या देशातील काही नागरिकांनी त्यांचा धर्म किंवा पंथ स्वीकारला आहे. असे असतनाही आज ते भारतात गुण्या गोविंदाने राहत आहेत. आपल्या देशात विविधता असूनही आपण सर्व एका मोठ्या समाजाचा भाग आहोत, असे आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले. प्रत्येकाची स्वतःची श्रद्धास्थाने, महापुरुष आणि प्रार्थनास्थळे असतात. विचार, शब्द आणि कृतीतून त्यांचा अनादर होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी समाजात प्रबोधनाची गरज असल्याचेही भागवत यांनी नमूद केले.
नियमांचे पालन करणे आणि सुसंवाद राखणे हा आपल्या जीवनाचा स्वभाव असायला हवा, असे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले. लहान-मोठ्या कारणांवरून किंवा फक्त संशयावरून कायदा हातात घेणे, गुंडगिरी किंवा हिंसाचार करणे चुकीची पद्धत आहे. अशा घटना अनेकदा पूर्वकल्पित कल्पनेने किंवा विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी उभ्या राहतात. त्यांच्या जाळ्यात अडकणे तात्काळ आणि दीर्घकालीन दृष्टीने हानिकारक ठरते.
भागवत यांनी सरकार आणि प्रशासन यांना पक्षपातीपणाशिवाय नियमांनुसार कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील सज्जनशक्ती आणि तरुण पिढीने सतर्क राहून आवश्यकतेनुसार हस्तक्षेप करावा, असेही त्यांनी म्हटले.
त्यांनी सध्या सुरु असलेल्या युद्धे, छोटे-मोठे संघर्ष, पर्यावरणीय ऱ्हास, समाज व कुटुंबांचे विघटन, नागरी जीवनात वाढता भ्रष्टाचार व अत्याचार याबद्दल चिंता व्यक्त केली. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न झाले तरी, त्यांची वाढ थांबवण्यात आणि पूर्ण उपाय देण्यात आपल्याला यश मिळालेले नाही, असेही भागवत यांनी नमूद केले.






