Bihar headquarters bans makeup and reels in police force in Bihar
Bihar Police News : पटना : बिहारमध्ये पोलिसांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बिहार पोलिसांना यापुढे वर्दी घातलेली असताना रिल्स शूट करता येणार नाही. त्याचबरोबर मेकअप देखील करता येणार नाही. यावर बंदी घालण्यात असून या निर्णय महिला पोलिसांबाबत देखील घेण्यात आला आहे. बिहार मुख्यालयातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून यामध्ये पोलिसांच्या वर्दीचा मान राखला जाणे हे उद्दिष्ट आहे.
बिहारमध्ये महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ऑन ड्युटी असताना मेकअप करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मेकअप न करण्याच्या सूचना या बिहार मुख्यालयातून देण्यात आल्या आहेत. पोलीस दलामध्ये शिस्त ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये पोलिसांबाबत आदर कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर वर्दी घातलेली असताना कोणत्याही प्रकारच्या व्हिडिओ तसेच रिल्स शूट करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गाण्यांवर वर्दी घालून रिल्स काढणाऱ्या पोलिसांना दणका बसला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महिला व पुरुष पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना लागू
बिहारमधील या नवीन नियमानुसार, ड्युटीवर रील बनवणे, सोशल मीडियासमोर शस्त्रे दाखवणे किंवा खासगी संभाषणासाठी ब्लूटूथ वापरणे यापुढे करता येणार नाही. पोलीस वर्दीचा अवमान होईल, असे कोणतेही कृत्य केल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याऱ्यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बिहार पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी मेकअप आणि दागिन्यांवर स्पष्टपणे बंदी घातली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे सर्व निर्देश महिलांसोबत पुरुष पोलिसांनासुद्धा लागू करण्यात आले आहेत. अशा स्वरुपाची बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कडक शिस्त पाळावी हा यामागील हेतू
बिहार पोलिसांवर यापूर्वी देखील बंधने लावण्यात आली होती. यापूर्वी ड्रेस कोड, मोबाईल फोनचा वापर आणि ड्युटी दरम्यान व्हिडिओ कॉलिंगबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. आता मात्र मेकअप, रिल्स आणि दागिने याबाबत देखील नियमावली काढण्यात आली आहे. बिहारमधील अनेक पोलीस हे ऑन ड्युटी किंवा वर्दीवर रिल्स काढत होते. सोशल मीडियावर अनेकांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. यामुळेच पोलिसांच्या रिल्सबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक धोरण आणि शिस्तीबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर यासंबंधित निर्णय घेण्यात आला आहे. “कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर लक्ष केंद्रित करावे आणि त्याचबरोबर विभागामध्ये कडक शिस्त पाळावी हा यामागील हेतू आहे,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.