Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारमध्ये राजकीय भूकंप! राजीनामा न देताचा नितीशकुमार होणार एनडीएचे नवीन मुख्यमंत्री; जाणून घ्या नेमकं काय होणार

  • By युवराज भगत
Updated On: Jan 27, 2024 | 09:09 PM
Bihar Politics : Nitish Kumar will become the Chief Minister of NDA government without resigning

Bihar Politics : Nitish Kumar will become the Chief Minister of NDA government without resigning

Follow Us
Close
Follow Us:

Bihar Politics Nitishkumar : भारतामध्ये इंडिया आघाडीमध्ये उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे. बिहारमधील अचानक (Bihar Politics) बदललेल्या राजकीय वातावरणात मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) पुढे काय घोषणा करणार, महाआघाडीत राहणार की राजीनामा देऊन भाजपसोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, ते भाजपसोबत गेले तरी राजीनामा देणार नसून ते राजभवनात जाणार असून त्यांच्यासोबत भाजपला पाठिंबा देणारे पत्र असू शकते आणि राष्ट्रीय जनता दलाच्या मंत्र्यांना बडतर्फ केले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

नितीशकुमार यांना राजीनामा देण्याची गरज नाही

भाजपने पाठिंबा दिल्यास नितीशकुमार यांना राजीनामा देण्याची गरज नाही, तेच मुख्यमंत्री राहतील, असे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत नितीशकुमार यांना फक्त राजदच्या आणि त्यांच्यासोबत आघाडीतील मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे लागेल. याचाच अर्थ नितीशकुमार हे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देताही सरकार बदलू शकतात.

2013 मधील घटनेची पुनरावृत्ती होणार?
16 जून 2013 रोजी भाजपशी संबंध तोडल्यानंतर त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या नितीशकुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळातील भाजपच्या 11 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केले. अशा परिस्थितीत नितीश कुमार पुन्हा एकदा 2013 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतात. मात्र, यावेळी भाजपचे नव्हे तर राजदचे मंत्री बरखास्त केले जातील.

2013 मध्ये नितीशकुमार यांच्याकडे आमदारांचे मोठे पाठबळ होते. स्वबळावर ते बहुमताच्या जवळ जात होते. मात्र, या वेळी नितीशकुमार यांच्याकडे फक्त 45 आमदार आहेत. तर, भाजपकडे 78 आमदार आहेत.

राजकीय अस्थिरता, नितीश सरकारी कामकाजात व्यस्त
मुख्यमंत्री नितीशकुमार शनिवारी सरकारी कामात व्यस्त राहिले आणि विकासकामांसाठी बक्सरला भेट दिली. नितीशकु्मार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागल्यानंतर इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना फोन केला पण ते नितीश कुमार यांच्याशी बोलू शकले नाहीत, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, राजदने पाटणा येथे आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत राजदचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी अजून खेळ पूर्ण होणे बाकी असल्याचे वक्तव्य केले.

नितीशकुमारांच्या पक्षाची पुनर्रचना
नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. विशेष म्हणजे राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांची गठित कार्यकारिणी बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

>> बिहारमधील संख्याबळ
> राष्ट्रीय जनता दल – 79

> भाजप – 78
> जेडीयू – 45
> काँग्रेस – 19
> CPI(ML)L – 12
> हम – 4
> CPI -2
> CPIM – 2
> अपक्ष,इतर – 1
> MIM – 1
————-
एकूण – 243

 

Web Title: Bihar politics nitish kumar will become chief minister of nda government without resigning learn the equation nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2024 | 09:09 PM

Topics:  

  • Nitish Kumar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.