Bihar Assembly Election: बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसच्या ‘प्रियदर्शिनी उडान योजने’अंतर्गत मोफत सॅनिटरी पॅड वाटप सुरू आहे. मात्र या पॅड्सच्या पॅकेटवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा फोटो असून “महिला न्याय, महिलांचा आदर” हे घोषवाक्य छापले गेले आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात नव्या वादाची ठिगणी पडली आहे.
काँग्रेसने या उपक्रमाला ‘पॅडमॅन’ चित्रपटातून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले आहे. पक्ष नेत्यांच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील ५ लाख महिलांना मोफत सॅनिटरी पॅड देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महिलांना २५०० रुपयांची आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने या उपक्रमाचे समर्थन करताना म्हटले आहे की, महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि मासिक पाळीबाबत जनजागृती वाढवणे हाच त्यामागील उद्देश आहे.
Microsoft 9,000 कर्मचाऱ्यांना काढणार कामावरून, पाकिस्तानमधील कार्यालयाला ठोकले कुलूप
मात्र विरोधकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. एनडीए घटकपक्ष केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. हाजीपूरमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “काँग्रेसला महिलांच्या आरोग्याची नव्हे, तर फक्त मतांची चिंता आहे. राहुल गांधींचा फोटो पॅडवर लावून निवडणुकीचा प्रचार केला जात आहे. ही निवडणूक नौटंकी आहे.” असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. तसेच, सॅनिटरी पॅडसारख्या संवेदनशील आरोग्य साहित्यावर राजकीय चेहरा झळकवून काँग्रेसने मतांसाठीची भावनात्मक खेळी केली आहे. या प्रकारामुळे व्होट बँकेच्या राजकारणाला एक नवाच आणि असहज रूप मिळाल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
या टीकेला उत्तर देताना काँग्रेसने स्पष्ट केले की ही योजना पूर्णपणे महिलांच्या आरोग्यविषयक गरजा, जनजागृती आणि सक्षमीकरणावर केंद्रित आहे. काहीजण हेतूपुरस्सर या उपक्रमाला वादग्रस्त बनवत असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या योजनेद्वारे फक्त मोफत सॅनिटरी पॅडचे वितरण नव्हे, तर ‘समानता’, ‘आदर’ आणि ‘न्याय’ या संकल्पनांद्वारे काँग्रेस महिला सक्षमीकरणाचा संदेश देत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
Vastu Tips: पैशाचा ओघ वाढवायचा असल्यास घरामध्ये आणा ‘ही’ वस्तू
सत्ताधारी पक्षनेत्यांच्य आरोपांवर काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी एक व्हिडीओ शेअर करत संबंधित पॅडबाबत स्पष्टीकरत देत राहुल गांधी यांचा फोटो असलेले पॅडचा व्हिडीओ खोटा आणि बनावट असल्याचे म्हटले आहे. संबंधित फोटो बनावट आहे. सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो छापण्यात तथ्य नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.
“जर तुम्ही पॅडकडे पाहिले तर… पॅडवर कुठेही कोणाचाही फोटो नाही. भाजप आणि त्यांचे लोक एक बनावट व्हिडिओ चालवत आहेत ज्यामध्ये सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो आहे. हे पूर्णपणे बनावट आहे. त्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. भाजप द्वेषात इतका खालच्या पातळीवर गेला आहे की त्यांनी त्यांच्या बहिणी आणि मुलींनाही सोडले नाही… लज्जास्पद” असं म्हणत अलका लांबा यांनी भाजपवर पलटवार केला आहे.