BJP announces Bihar bandh over abuse of PM Narendra Modi
पटना : बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून जोरदार राजकारण रंगले आहे. यामध्ये कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार अधिकार यात्रा देखील काढली. दरम्यान, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अर्वाच्य भाषेतून शिवीगाळ करण्यात आली. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून यावरुन आता भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतला आहे.
बिहारमध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवीगाळ झाली होती. त्यांच्या आईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. यामुळे भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याविरोधात भाजपने बिहार बंदची घोषणा केली आहे. हा बंद सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत असणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खरं तर, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील अलिकडेच झालेल्या मतदान अधिकार यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदींवर शिवीगाळ करण्यात आली होती. यावर भाजप नेत्यांनी गोंधळ घातला आहे. मात्र, आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे आणि काँग्रेस पक्षाने तरुणांपासून स्वतःला दूर ठेवले आहे.
इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरून शिवीगाळ झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. भावनिक झालेल्या पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा केवळ त्यांच्या आईचा नाही तर प्रत्येक आई आणि बहिणीचा अपमान आहे. माझ्या आईचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. तिची काय चूक होती? तिच्याविरुद्ध शिवीगाळ का केली गेली? मी आरजेडी आणि काँग्रेसला माफ करू शकतो, पण बिहारची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा आंदोलनावर उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया
माझ्या पोटात असतं तेच माझ्या ओठात असतं. जे योग्य आहे तेच मी योग्य म्हणत असतो, माझी प्रकृती बरी नाहीये म्हणून मी आरक्षणाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. या आधी मी अंतरवालीला गेलो होतो. शासनाने लवकरात लवकर या आंदोलनावर तोडगा काढावा. जे आंदोलन करतायेत त्यांच्या प्रमुखांसोबत बोलून लवकरात लवकर मार्ग काढावा. मला कालच डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे मी तिथे येऊ शकत नाही. माझं मुख्यमंत्री यांच्यासोबत अजून बोलणं झालं नाही. मात्र माध्यमांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना विनंती आहे, आंदोलनकर्त्यांसोबत बसून काय तोडगा काढता येईल हे पाहावं. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असं आवाहन उदयनराजे यांनी केलं आहे. तसेच आंदोलकांना मूलभूत सुविधा शासनाने पुवाव्यात अशीही मागणी त्यांनी केली.