BJP News: दक्षिणेत सत्ता आणण्यासाठी भाजपची नवी खेळी; 'या' नेत्यावर सोपवली केरळच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी
तिरूवअनंतपुरम: भाजपने केरळमध्ये एक मोठी खेळी खेळली आहे. भाजपने माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजीव चंद्रशेखर यांची भाजपने केरळच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. केरळ भाजपचे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वात भाजपची राज्य परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत राजीव चंद्रशेखर यांना केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
रविवारी, राजीव चंद्रशेखर यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रशेखर प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तुमच्या मनात हा प्रश्न येणे स्वाभाविक आहे की लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही आणि त्यांना केंद्रीय मंत्रीपद देऊनही पक्षाने राज्याची सूत्रे त्यांच्याकडे का सोपवली आहेत? तर चला याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.
राजीव चंद्रशेखर यांनी रविवारी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजीव चंद्रशेखर प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही आणि ते केंद्रीय मंत्री राहिलेले असून देखील त्यांना ही जबाबदारी देण्यामागचे कारण काय? चल तर मग यामागची कारण जाणून घेऊयात.
केरळमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने एक जागा जिंकली आहे. केरळमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हापासून, भाजप राज्यात आपले अस्तित्व वाढवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी, भाजपचे उद्दिष्ट जास्तीत जास्त मते मिळवणे व जास्तीत जागा जिंकणे हे आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत राजीव चंद्रशेखर यांनी केरळच्या तिरुअनंतपुरम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी तीन वेळा खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या विरुद्ध जोरदार लढत दिली होती.
गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत राजीव चंद्रशेखर यांनी केरळच्या तिरुअनंतपुरम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी तीन वेळा खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांना जोरदार टक्कर दिली. राजीव चंद्रशेखर यांचा शशी थरूर यांच्याकडून १६,००० मतांनी पराभव झाला. या जागेवरील त्यांच्या कामगिरीने भाजपला खूप प्रभावित केले. दोन महिन्यांतच त्यांनी या जागेवर भाजपसाठी खूप सकारात्मक वातावरण निर्माण केले होते.
शशी थरूर यांच्या वक्तव्यांने कॉंग्रेसमध्ये खळबळ
केरळमधील पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केल्यामुळे कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पक्षांतर्गत टीकेचा सामना करावा लागला होता. या टीकेला उत्तर देताना शशी थरूर यांनी, पक्षाला जर माझी गरज नसेल तर आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत, असं म्हणत इशारा दिला होता. दरम्यान या विधानावर सारवासारव करताना त्यांनी, पक्ष पक्ष बदलण्याच्या अफवाचं खंडण केलं असून पक्षात मतभेद असले तरी कॉंग्रेस सोडणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.