Election News: राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठी १५ लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही मर्यादा फक्त कागदावरच राहील, पडद्यामागे प्रत्येक उमेदवार कोट्यवधी खर्च करेल.
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते, सर्वाधिक बंडखोरी ही शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेतून 35 ते 40 ठिकाणी बंडखोरी झाली आहे.
मुंबईत अध्यक्ष अमित साटम, प्रविण दरेकर, आशिष शेलार या सारख्या नेत्यांवरही नाराजांची समजूत घालण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईत भाजपाच्या या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळत आहे.
उमेदवारी नाकारल्यामुळे काही तुल्यबळ उमेदवारांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून उमेदवारी मिळवित आपले आव्हान कायम ठेवले आहे. त्यांचे आव्हान भाजप कसे माेडीत काढणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत कौटुंबिक संबंधांवर आधारित निवडणूक तिकिटांचे वाटप बरेच व्यापक झाले आहे. यावेळी मात्र "कुटुंबाला प्राधान्य" देणारे राजकारण समीकरणे बदल्याची पाहायला मिळत आहे.
२०१७ पासून आपण सातत्याने पक्षाकडे उमेदवारीची मागणी करत होतो, असे त्यांनी सांगितले. सरचिटणीस पदावर कार्यरत असताना उमेदवारीची मागणी न्याय्य होती, असा दावाही त्यांनी केला.
शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
उल्हासनगर शहरातील गुंडाराज संपविण्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारांना केले आहे. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे ओमी कलानी यांच्यावर टीका केली आहे.
BJP Pune: मागील पंचवार्षिक निवडणुकीत महंमदवाडी प्रभागात भाजप पक्षाचे संजयतात्या एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महंमदवाडी-उंड्री ४१ प्रभागात भाजपाचे अनेक इच्छुक उमेदवार होते.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून भाजपमध्ये अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे. महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारीसाठी मातब्बरांची कसोटी लागली आहे.
Political News: हा घोटाळा 1500 कोटींचा असून यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले आहे. वीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
सोमवार पर्यंत महापालिके निवडणुकीसाठी ४०० च्यावर अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने एकाच दिवशी किमान १००० अर्ज दाखल होतील अशी गर्दी दिसून आली.
राज्यातील 14 ठिकाणी महायुती तुटलेली असली, तरी मुंबई आणि ठाण्यासारख्या राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची युती कायम ठेवण्यात आली आहे.