Bjp leader Anurag Thakur press live on Rahul Gandhi constituency Raebareli Voter Fraud
Anurag Thakur on Raebareli Voter Fraud : नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये मतचोरी हा मुद्दा जोरदार चर्चेत आणला आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र, झारखंड आणि अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामध्ये मतदारांची यादीतून नावे वगळणे, मेलेल्यांकडून मतदान झाल्याचे दाखवणे आणि तसेच एका व्यक्तीची वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदान केले असल्याचे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले आहे. यावर आता भाजपने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींच्या मतदारसंघामध्ये घोटाळा झाला असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आणि पुराव सादर करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणुकीमध्ये आयोगाचे मतदार यादींमध्ये घोळ आणि मतचोरी केली असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. या संदर्भात त्यांनी आंदोलन देखील केले असून भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर आता भाजपने देखील राहुल गांधी यांची पालखोल करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी खसादार राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमध्ये मतचोरी झाली असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसवर जोरदार टीका करत राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला आहे. त्याचबरोबर भारतीय नागरिकांच्या मतांना कॉंग्रेस कमी दाखवू इच्छित आहे, असा आरोप देखील अनुराग ठाकूर यांनी केला आहे.
काय म्हणाले अनुराग ठाकूर?
भाजप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, जेव्हा बिहारमध्ये SIR करण्यास सुरुवात झाली तर याचा हेतू बनावट मतदार हटवले जावाते आणि खऱ्या नागरिकांचे हक्क हिरावून घेतले जाऊ नयेत हाच होता. मात्र कॉंग्रेस पक्ष याला देखील विरोध करत आहे. शेवटी, ते भारतातील लोकांच्या मतांना कमी लेखू का इच्छित आहे? जर भारतातील मतदारांनी वारंवार काँग्रेसला मतदान केले आहे, तर आता काँग्रेस फक्त तिच्या घुसखोर मतपेढीपुरती मर्यादित राहू इच्छिते का? असा सवाल भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अनुराग ठाकूर म्हणाले, “रायबरेलीत ८३, १५१, २१८ क्रमांकाच्या सर्व बूथ क्रमांकामध्ये मोहम्मद कैफ खान या व्यक्तीचे नाव आहे. घर क्रमांक १०३ मधील मतदान केंद्र क्रमांक १८९ वर ४७ मतदार ओळखपत्रे नोंदणीकृत आहेत. बंगालमधील डायमंड हार्बर येथील घर क्रमांक ००११, बूथ क्रमांक १०३ वर अनेक थर्मो मतदार नोंदणीकृत आहेत. रायबरेलीत एकाच घरात ४७ मतदार कसे नोंदणीकृत आहेत, राहुल जी आणि सोनिया जी यांना कधीच ही नावे दिसून आली नाहीत, असे म्हणत अनुराग ठाकूर यांनी रायबरेलीमध्ये देखील मतदारांबाबत घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता या मतचोरीच्या आरोपाला नवे वळण मिळाले आहे.