
सर्वत्र 'कमळ'च; महाराष्ट्रापाठोपाठ भाजपने 'या' राज्यात केली जादू; PM मोदींनी केले अभिनंदन
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात भाजपचा दणदणीत विजय
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन
पंचायत निवडणुकीत भाजप- एमजीपीचे मोठे यश
Goa Elections: भाजपने गोवा राज्यात देखील जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केली आहे. गोवा राज्याच्या राजकारणात भाजप-एमजीपी युती पुन्हा एकदा यशवी ठरली आहे. एनडीएने मोठे यश प्राप्त केले आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील जनतेचे आभार मानले आहेत.
भाजपने गोव्यात केलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “हा विजय राज्यातील सूशासन आणि विकासाच्या राजकारणाला असलेला पाठिंबा आहे. २०२७ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी याकडे एक सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. ज्यात सत्ताधारी पक्षाने आपली पकड कायम ठेवली आहे.”
Goa stands with good governance. Goa stands with progressive politics. I thank my sisters and brothers of Goa for blessing the BJP–MGP (NDA) family with strong support in the Zilla Panchayat elections. This will add more vigour to our efforts for Goa’s growth. We are committed… https://t.co/rRI3vidqNc — Narendra Modi (@narendramodi) December 22, 2025
भाजपचा ३० जागांवर विजय
गोव्यात ५० जागांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपने सर्वाधिक ३० जागा जिंकल्या आहेत. तर गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. मागील वेळेपेक्षा काही जागा कमी असल्याचे समोर आले आहे. मात्र भाजप-एमजीपीकडे बहुमत आहे.
कॉँग्रेसची स्थिती काय?
भाजपने ४० जागा निवडणुकीत लढवल्या होत्या. आम आदमी पक्षाने ४२ तर कॉँग्रेसने ३६ जागा लढवल्या. कॉँग्रेस व गोवा फॉरवर्ड पक्षाने युती केल्याने आकडेवारीत यंदा बदल दिसून आल्याचे म्हटले जात आहे.