Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : रस्ते, महिलांची सुरक्षा अन्…; महापौरपदी निवड होताच निकम यांची मोठी माहिती

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम यांची, तर उपमहापौरपदी जनसुराज्यशक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची शुक्रवारी बहुमताने निवड झाली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 07, 2026 | 01:40 PM
रस्ते, महिलांची सुरक्षा अन्...; महापौरपदी निवड होताच निकम यांची मोठी माहिती

रस्ते, महिलांची सुरक्षा अन्...; महापौरपदी निवड होताच निकम यांची मोठी माहिती

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम यांची, तर उपमहापौरपदी जनसुराज्यशक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची शुक्रवारी बहुमताने निवड झाली. निकम आणि जरग यांच्या निवडीने कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महायुतीचा झेंडा फडकवला आहे. निकम व जरग यांची बहुमताने निवड होताच त्यांच्या समर्थकांनी वाद्याच्या गजरात गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत रूपाराणी निकम यांना ४६ मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सचिन मारुती शेंडे यांना ३५ मते मिळाली. त्यामुळे रूपाराणी निकम या विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

 

उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांनी काँग्रेसच्या दुर्वास परशुराम कदम यांचा पराभव केला. जरग यांना ४६, तर कदम यांना ३५ मते मिळाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक ३४ जागा जिंकून देखील काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली.

गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी

महापौर व उपमहापौर पदासाठी ४६ विरुद्ध ३५ असे मतदान झाले. तब्बल दहा मतांच्या फरकाने रुपाराणी निकम महापौर झाल्या. तर दहा मतांच्या फरकानेच अमोल जरग उपमहापौरपदी विराजमान झाले. हात उंचावून व सह्यांची मोहीम राबवत मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली. महापौर व उपमहापौर निवडीनंतर जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी नूतन महापौर व‌ उपमहापौर यांना पुष्पगुच्छ देत स्वागत केले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला.

कोल्हापूर महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी व जनतेला न्याय देण्यासाठी महापौर जनतेच्या दारी असा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या समजून घेत सोडवणार आहे. शहराची हद्दवाढ गरजेची असल्याने लोकांना विश्वासात घेऊन हद्दवाढीचा प्रश्नही मार्गी लावणार आहे. रस्ते, स्वच्छता, पाणी यासह नागरिकांचे प्रश्न व महिलांची सुरक्षा यावर जास्तीत जास्त भर देणार आहे. – रूपाराणी निकम, महापौर कोल्हापूर मनपा

मोठा पोलीस बंदोबस्त

महापौर व उपमहापौर निवडीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेट पासूनच प्रत्येकाला पास चेक करून महापालिकेत सोडण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली होती. तसेच ऐनवेळी कोणाला काही झाल्यास प्राथमिक उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडली. त्यांनी दिलेला शब्द पाळत सन्मानाने जनसुराज्य शक्ती पक्षाला उपमहापौर पद दिले. आमच्याकडे सत्तेच्या चाव्या असल्याने पाच वर्षात लोकांच्या विकासासाठी काम करणार. कोल्हापूर शहरातील सर्व नागरिकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावर भर देणार. – अमोल जरग, उपमहापौर कोल्हापूर मनपा. रुपाराणी निकम ५१ व्या महापौर

महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत ५० महापौर झाले. तर आत्ता ५१ व्या महापौर म्हणून रुपाराणी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. येत्या काही दिवसात नूतन महापौर सभा घेऊन सभागृहाचा ताबा घेतील. महापालिकेच्या स्थापनेपासून भाजपने पहिल्यांदाच महापौर रूपाराणी निकम यांच्या रूपाने महापालिकेवर आपला झेंडा लावत गुलाल उधळला आहे.

हे सुद्धा वाचा : महापौरपदाची सूत्रे हाती घेताच लांडगेंनी पिंपरी-चिंचवडकरांना दिले ‘हे’ मोठे आश्वासन; आता शहरवासियांना दररोज…

Web Title: Kolhapur mayor ruparani nikam has made a big promise to the people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • BJP
  • kolhapur
  • shivsena

संबंधित बातम्या

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…
1

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
2

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद; कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर थेट निशाणा, सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद
3

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद; कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर थेट निशाणा, सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
4

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.