Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँक आणि रेल्वेच्या खासगीकरणामुळे बेरोजगारीत पडेल भर, खासदार वरुण गांधींचा भाजपला घरचा आहेर

केवळ बँका आणि रेल्वेचे खाजगीकरण (Bank And Railway Privatization) केल्याने पाच लाख कर्मचारी बळजबरीने सेवानिवृत्त म्हणजेच बेरोजगार (Unemployment) होतील. प्रत्येकाचे काम संपल्याने लाखो कुटुंबांच्या आशा संपत आहेत. सामाजिक स्तरावर आर्थिक विषमता निर्माण करून ‘लोककल्याणकारी सरकार’ कधीही भांडवलशाहीला चालना देऊ शकत नाही,असे ट्विट वरुण गांधी (Varun Gandhi Tweet) यांनी केले आहे.

  • By साधना
Updated On: Feb 22, 2022 | 06:16 PM
varun gandhi

varun gandhi

Follow Us
Close
Follow Us:

भाजपा (BJP) खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी आपल्या पक्षावर टीका करत घरचा आहेर दिला आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी बँक आणि रेल्वेच्या खासगीकरणावर (Privatization Of Railway And Bank) चिंता व्यक्त केली. सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत, असे वरुण गांधी यांनी म्हटले आहे. पीलीभीतचे खासदार वरुण गांधी अनेकदा आपल्या प्रश्नांवरून भाजपाला (Varun Gandhi Criticized BJP)  घेरत असतात. यावेळी त्यांनी बँक आणि रेल्वेच्या खासगीकरणावर भाष्य केले आहे.

केवल बैंक और रेलवे का निजीकरण ही 5 लाख कर्मचारियों को ‘जबरन सेवानिवृत्त’ यानि बेरोजगार कर देगा।

समाप्त होती हर नौकरी के साथ ही समाप्त हो जाती है लाखों परिवारों की उम्मीदें।

सामाजिक स्तर पर आर्थिक असमानता पैदा कर एक ‘लोक कल्याणकारी सरकार’ पूंजीवाद को बढ़ावा कभी नहीं दे सकती।

— Varun Gandhi (@varungandhi80) February 22, 2022

“केवळ बँका आणि रेल्वेचे खाजगीकरण केल्याने पाच लाख कर्मचारी बळजबरीने सेवानिवृत्त म्हणजेच बेरोजगार होतील. प्रत्येकाचे काम संपल्याने लाखो कुटुंबांच्या आशा संपत आहेत. सामाजिक स्तरावर आर्थिक विषमता निर्माण करून ‘लोककल्याणकारी सरकार’ कधीही भांडवलशाहीला चालना देऊ शकत नाही,” असे ट्विट वरुण गांधी यांनी केले आहे.

[read_also content=”रशिया – युक्रेन वादाचा शेअर बाजाराला मोठा फटका, सेन्सेक्सची ३८३ अंकांची घसरण https://www.navarashtra.com/business/russia-ukraine-dispute-effect-on-share-market-sensex-down-by-383-points-nrsr-243406/”]

याआधीही राहुल गांधींसह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी खाजगीकरणावरुन भाजपा सरकारला घेरले आहेत. भारताचे रेल्वेचे जाळे हे जगातील सर्वात मोठे रेल्वेपैकी आहे. भारतीय रेल्वे १३ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देते. गेल्या वर्षी जेव्हा आणखी प्रश्न उपस्थित केले गेले तेव्हा माजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेचे कधीही खाजगीकरण होणार नाही, असे म्हटले होते.

सरकारच्या दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणालाही विरोधकांनी विरोध दर्शवला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, असे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र हे सरकार एक एक करून विलीनीकरण करत आहे. त्यामुळे गरिबांना बँकांचा लाभ मिळणार नाही. काही मोजक्याच लोकांना बँकांचा लाभ मिळावा म्हणून हे काम केले जात आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Web Title: Bjp mp varun gandhi comment about modi government decision of railway and bank privatization nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2022 | 06:07 PM

Topics:  

  • Varun Gandhi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.