Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP New President News: भाजपला कधी मिळणार राष्ट्रीय अध्यक्ष? राजनाथ सिंहांनी स्पष्टच सांगितलं

भाजप नेहमीच  धक्कातंत्रासाठी  ओळखला जात असल्याने या यादीत अजून एखादे नवीन आणि अनपेक्षित नाव जोडले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 08, 2025 | 04:23 PM
BJP New President News:

BJP New President News:

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त
  • जे.पी. नड्डा यांच्याकडे तात्पुरता कार्यभार
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या कोणत्याही राजकीय निर्णयात हस्तक्षेप करत नाही

BJP New President News: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शोधात आहेत. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सुत्रे सध्या जे.पी. नड्डा यांच्याकडे आहेत. पण मागील अनेक दिवसांपासून भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाला मिळणार याबाबत अनेक चर्चाही सुरू आहेत, अध्यक्षपदासाठी आतापर्यंत अनेकांची नावेही समोर आली, पण कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. असे असतानाच आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत महत्त्वाचे विधान केल आहे. बिहार विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल असे त्यांनी सांगितले. शिवाय, याबाबत पक्षात कोणताही मतभेद नसल्याचेही त्यांनी नमुद केलं आहे.

एक हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, “बिहार विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला पुढील भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांचे नाव ऐकायला मिळेल. आमच्या पक्षात कोणताही मतभेद नाही. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या कोणत्याही राजकीय निर्णयात हस्तक्षेप करत नाही,मी लहानपणापासूनच आरएसएसशी जोडलेलो आहे. आरएसएस देशभक्ती जागृत करण्याचे काम करते, असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

पक्षाला त्याचा १२ वा अध्यक्ष मिळेल

राजनाथ सिंह म्हणाले, ” पुढील अध्यक्ष पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. जेपी नड्डा यांनी पहिल्यांदा २०१९ मध्ये कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि २०२० मध्ये त्यांची अधिकृत निवड झाली. नड्डा यांना अलीकडेच आरोग्य आणि रसायने आणि खते मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरू झाला आहे.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकींवर भाष्य केलं. “बिहारमध्ये एनडीएचा विजय होईल आणि पुढील पाच वर्षे बिहारमध्ये एनडीएची सत्ता असेल, जनतेच्या प्रतिसादामुळे आम्ही सरकार स्थापन करू आणि दोन तृतीयांश बहुमत मिळवू. बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजप अध्यक्षपदासाठी शर्यत : शिवराज, खट्टर, यादव आणि प्रधान आघाडीवर

 भाजप अध्यक्षपदासाठी नवे नेतृत्व ठरवण्याची प्रक्रिया सुरू असून अनेक वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान ही प्रमुख नावे आघाडीवर आहेत.

 भाजप नेहमीच  धक्कातंत्रासाठी  ओळखला जात असल्याने या यादीत अजून एखादे नवीन आणि अनपेक्षित नाव जोडले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीनंतरच या राजकीय शर्यतीचा निकाल लागेल, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

 

Web Title: Bjp new president news when will bjp get a national president rajnath singh made it clear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • BJP
  • J. P. Nadda

संबंधित बातम्या

गडहिंग्लजमध्ये राजकीय हालचालींना वेग; उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी लावली फिल्डिंग
1

गडहिंग्लजमध्ये राजकीय हालचालींना वेग; उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी लावली फिल्डिंग

तासगावात भाजप स्वबळावर मैदानात उतरण्यासाठी सज्ज; संजय पाटील गटाला आव्हान
2

तासगावात भाजप स्वबळावर मैदानात उतरण्यासाठी सज्ज; संजय पाटील गटाला आव्हान

Palghar News: पालघरमध्ये बोगस नोंदणीचा आरोप; भाजपा-शिवसेना शिंदे गट आमनेसामने
3

Palghar News: पालघरमध्ये बोगस नोंदणीचा आरोप; भाजपा-शिवसेना शिंदे गट आमनेसामने

Narendra Modi : “जेव्हा निकाल येईल, तेव्हा एकमेकांचे झिंझ्या उपटतील…”, बिहार मतदानावरून पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर हल्लाबोल
4

Narendra Modi : “जेव्हा निकाल येईल, तेव्हा एकमेकांचे झिंझ्या उपटतील…”, बिहार मतदानावरून पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.