Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅलिफोर्निया येथे अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह सापडले

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 06, 2022 | 01:04 PM
कॅलिफोर्निया येथे अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह सापडले
Follow Us
Close
Follow Us:

कॅलिफोर्निया (California) येथून अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आलेत यात भारतीय वंशाचे आठ महिन्यांचे बाळ, त्याचे आई-वडील आणि काकाचा (चुलता) समावेश आहे. या कुटुंबाचे कॅलिफोर्निया येथून काही दिवसांपूर्वीच अपहरण झाले होते. स्थानिक अधिकाऱ्यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, हे कुटुंब भारतीय वंशाचे असून सोमवारी बेपत्ता झाले होते. आतापर्यंत अपहरणाच्या गुन्ह्यात एका ४८ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, मर्सिड काउंटी शेरीफ व्हर्न वॉर्नके म्हणाले, ही घटना अत्यंत भयानक आणि धक्कादायक आहे. या प्रकरणात ज्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे तो एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो आहे. तो एका कुटुंबला जबरदस्तीने ट्रकमध्ये बसवतानाही दिसतो आहे.

आठ महिन्यांचे अर्भक, तिचे आई-वडील जसलीन कौर आणि जसदीप सिंग आणि काका अमनदीप सिंग हे सोमवारपासून बेपत्ता होते. काही काळ वाट पाहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडे मदत मागितली होती.

मर्सिड काउंटी शेरीफ व्हर्न वॉर्नके म्हणाले की, या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती सध्या कोठडीत आहे. या व्यक्तीला 2005 मध्ये सशस्त्र दरोडा आणि खोट्या तुरुंगवासाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात आणखीही काही लोक असण्याची शक्यता व्हर्ना वॉर्नके यांनी व्यक्त केली.

पोलिसांकडे असलेल्या पुराव्यांपैकी एक असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, जसदीप आणि अमनदीप यांचे कुटुंब नऊ मिनिटांच्या अंतराने एका व्यावसायिक ट्रकमधून येताना दिसले. जसदीपला कचरा पिशवी घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीशी काही चर्चा करतानाही व्हिडिओत पाहायला मिळाले. ज्या व्यक्तीच्या हातात बंदूक असल्याचेही दिसते. या व्हिडिओनंतर पोलिसांचा संशय वाढला आहे.

Web Title: Bodies of 4 members of indian origin family abducted in california found nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2022 | 01:04 PM

Topics:  

  • California news

संबंधित बातम्या

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral
1

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

वाळवंटात बांधलेला शिशमहाल तुम्ही पाहिला का? रात्र होताच होतो गायब… दृश्य इतके अनोखे की पाहूनच उडतील होश; Video Viral
2

वाळवंटात बांधलेला शिशमहाल तुम्ही पाहिला का? रात्र होताच होतो गायब… दृश्य इतके अनोखे की पाहूनच उडतील होश; Video Viral

अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ
3

अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ

कॅलिफोर्नियात आढळला मानवी कातडी अन् रक्ताने माखलेला बाहुला? काय आहे भयावह सत्य, VIDEO पाहून उडेल थरकाप
4

कॅलिफोर्नियात आढळला मानवी कातडी अन् रक्ताने माखलेला बाहुला? काय आहे भयावह सत्य, VIDEO पाहून उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.