
नवी मुंबई : काही दिवसापुर्वी नवी मुंबईतील तळोजा कारागृह परिसरात एका 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता. या हत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू होता. अखेर या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं असून मुलीची हत्या (Boyfriend Killed Girlfriend ) माहिती समोर आली आहे. मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीनेही तीची हत्या केल्यानंतर मुलानेही रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळ दौऱ्यावर, गुरुवयूरनंतर रामास्वामी मंदिरात केली पुजा; 4,000 कोटी रुपयांच्या योजनांचा करणार शुभारंभ! https://www.navarashtra.com/india/prime-minister-narendra-modi-on-kerala-visit-performs-puja-at-ramaswamy-temple-after-guruvayoor-nrps-498817.html”]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जानेवारीला एका मुलीची हरवल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. मुख्या म्हणजे त्याच दिवशी एका मुलाने रेल्वेतून उडी मारुन आत्महत्या केली होती व त्याच्यासोबत असणाऱ्या सुसाईड नोटमध्ये मी मैत्रीणीची हत्या केली असे लिहिले होते. या दोन्ही प्रकरणाचा तपास सुरू होता. दरम्यान मुलीचा शोध घेताना तळोजा कारागृहातील बाजूस असणाऱ्या जंगलात एका 19 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळुन आला. हा मृतदेह त्याच बेपत्ता मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल केला आहे.
पोलिसांना चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, त्या मृत 19 वर्षीय या तरुणीचे मागील चार ते पाच वर्षांपासून एका मुलासोबत प्रेमसंबंध होते मात्र तिने प्रेम प्रकरण पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्याने मुलगा संतापला होता. यावरुन त्यांच्यात वादही झाला. रागाच्या भरात त्याने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून तिची मुलीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे मुलीची हत्या केल्यानंतर या मुलानेही रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.