Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेकींग! भाजपकडून लोकसभा उमेदवारांची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी, वाचा सविस्तर

BJP Loksabha Election Candidate list : भाजपने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Mar 02, 2024 | 07:18 PM
Breaking! First list of Lok Sabha candidates announced by BJP; Who got a chance and some got cut, read in detail

Breaking! First list of Lok Sabha candidates announced by BJP; Who got a chance and some got cut, read in detail

Follow Us
Close
Follow Us:
नवी दिल्ली : आगामी येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे सांगितले. भाजपच्या पहिल्या यादीत 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे.
भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बराच खल
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक पार पडली होती. ही बैठक रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुरु होती. या बैठकीत भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बराच खल झाला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या बैठकीत 150 ते 200 उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आज अखेर भाजपकडून  उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
भाजपच्या कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळाली?
वाराणसी – नरेंद्र मोदी
अंदमान निकोबार – विष्णू पडा रे
अरुणाचल पश्चिम – किरण रिजिजू
अरुणाचल पूर्व – तपिर गावो
आसाम
सिलचर – परिमल शुक्ल वैद्य
गुवाहाटी – बिजुली कलिता
तेजपुर – रणजित दत्ता
नौगाव – सुरेश बोरा
दिबृगड – सर्वानंद सोनोवाल
छत्तीसगड
विलापसुर – तोखन साहू
राजनंदगाव – संतोष पांडे
रायपूर – ब्रिजमोहन अग्रवाल
बस्तर – महेश कश्यप
दादरा नगर हवेली- लालुभाई पटेल
दिल्ली
चांदनी चौक – प्रवीण खंडेलवाल
उत्तर पूर्वी दिल्ली – मनोज तिवारी
बांसुरी स्वराज
दक्षिण दिल्ली – रामविर सिंग बिधुडी
उत्तर गोवा
श्रीपाद नाईक
गांधीनगर – अमित शाह
राजकोट – पुरुषोत्तम रुपाला
पोरबंदर – मनसुख मांडवीय
नौसारी – सी. आर पाटील
जम्मू काश्मीर- डॉ. जितेंद्र सिंग
कोडरमाल – अन्नपूर्णा देवी
हजारीबाग – मनीष जैस्वाल
केरळ
कासरगोड – एम एल अश्विनी
कन्नूर – प्रफुल्ल कृष्ण
कोझिकोडे – एम टी रमेश
त्रिशुर – सुरेश गोपी
अल्पुझा – शोभा सुरेंद्र
अटींगल – वी मुरलीधरन
 युवराज सिंग, अक्षय कुमारही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काही सेलिब्रिटींनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. भाजपकडून युवराज सिंग याला पंजाबच्या गुरदासपूर या प्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. तर अभिनेता अक्षय कुमार याला चंदीगढ किंवा दिल्लीतील एखाद्या लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे.
लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपकडून सर्व इच्छूक नेत्यांची खोलवर जाऊन चौकशी करण्यात आली होती. संबंधित लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांना पाठवून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. तसेच नमो अॅपच्या माध्यमातून नागरिकांकडून विद्यमान खासदारांविषयी माहिती जाणून घेण्यात आली होती. लोकसभेच्या एका जागेसाठी दोन ते तीन नेत्यांचा विचार करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम उमेदवाराची निवड करण्यात आली.

Web Title: Breaking first list of lok sabha 2024 candidates announced by bjp who got a chance and some got cut read in detail nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2024 | 07:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.