Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lok Sabha Election अगोदर देशात CAA कायदा लागू करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा

Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीअगोदर देशात सीएए कायदा (CAA Law) लागू करणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. त्यानंतर कोणाचंही नागरिकत्व हिसकावलं जाणार नाही, असे वक्तव्य अमित शहांनी केले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 10, 2024 | 02:44 PM
Home Minister Amit Shah

Home Minister Amit Shah

Follow Us
Close
Follow Us:

Home Minister Amit Shah On CAA : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शनिवारी (10 फेब्रुवारी) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Elections 2024) देशात सीएए कायदा (CAA Law) लागू करणार असल्याची मोठी घोषणा अमित शहांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल आणि त्याची अंमलबजावणीही केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, CAA ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही, असे वक्तव्य गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगालच्या भेटीदरम्यान अमित शहांनी केले होते.

ANI वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह म्हणाले, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की, CAA कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही. या कायद्याचा उद्देश केवळ धार्मिक छळाचा सामना करीत असलेल्या पाकिस्तानी, अफगाणिस्तानी आणि बांग्लादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणं आहे.”

आमचं नाही, काँग्रेसनं दिलंय वचन : अमित शाह
अमित शाह म्हणाले की, काँग्रेसनं शेजारील देशातील अत्याचारित अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचं आश्वासन दिलं आहे. ते म्हणाले की, “जेव्हा देशाची फाळणी झाली आणि तिथे अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले, तेव्हा सर्वांना भारतात पळून यायचं होतं, तेव्हा काँग्रेसनं सांगितलं होतं की, तुम्ही इथे या, तुम्हाला इथलं नागरिकत्व दिलं जाईल.”

विरोधक मुस्लिम समाजाची दिशाभूल करतायत : अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांवर मुस्लिमांची दिशाभूल केल्याचा आरोपही केला आहे. अमित शाह म्हणाले की, “सीएएबद्दल आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे आणि त्यांना चिथवलं जात आहे. सीएए केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारनं लागू केलेल्या सीएएचं उद्दिष्ट 31 डिसेंबर 2014 पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणं आहे.

ही निवडणूक विकास विरुद्ध भ्रष्टाचार : अमित शाह
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की, ही निवडणूक विकास विरुद्ध भ्रष्टाचाराची आहे. ही निवडणूक I.N.D.I.A विरुद्ध NDA बद्दल नाही. ही निवडणूक भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहिष्णुता विरुद्ध भ्रष्ट प्रशासना विरुद्ध आहे. ही निवडणूक ज्यांना राष्ट्रीय सुरक्षा मिळवायची आहे विरुद्ध जे परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणतात त्यांच्याबद्दल आहे. ” दरम्यान, डिसेंबर 2019 मध्ये संसदेनं CAA मंजूर केला आणि त्यानंतर राष्ट्रपतींनीही CAA ला मंजूरी दिली. त्यानंतर या कायद्याला विरोध दर्शवत देशाच्या विविध भागांमध्ये निदर्शनं करण्यात आली होती.

Web Title: Caa will be implemented in country before lok sabha election 2024 a big announcement by union home minister amit shah nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2024 | 02:42 PM

Topics:  

  • Lok Sabha Election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.